आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘बी. फार्मसी’च्या पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी (७ डिसेंबर) सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तर डिप्लोमाचे अलॉटमेंट ९ डिसेंबरला होईल. तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३ ते ५ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदवण्याची मुदत होती. अंतिम गुणवत्ता यादीनंतर ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरूवात होईल. दुसरीकडे डिप्लोमा फार्मसीच्या प्रवेशाचे ६ डिसेंबरपासून ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाड्यातील डीफार्मसीच्या १०४ महाविद्यालयांत ६,५४० प्रवेश क्षमता आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रम सुमारे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ औषधनिर्माणशास्रचे प्रवेश रखडले होते. मात्र सीईटी सेलने नोव्हेंबर अखेरीस कॅप राऊंडचे वेळापत्रक जाहीर केले आहे. फार्मसी काैन्सिल ऑफ इंडियाकडून नव्या काॅलेजांची पडताळणीस उशीर झाला आहे. त्यामुळे यंदा औषधनिर्माणशास्त्राच्या प्रवेशाला विलंब झाला. नव्या कॉलेजांना मान्यता आता दिली असून सीईटी सेलने प्रक्रिया सुरळित केली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत होती. अंतिम गुणवत्ता यादी ७ डिसेंबरला सायंकाळपर्यंत झळकणार आहे. ८ ते १० डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. १३ तारखेला प्रवेश निश्चित केलेल्यांची अलॉटमेंट लिस्ट जारी होईल. त्यानंतर १४ ते १६ डिसेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना दिलेल्या कॉलेजमध्ये जाऊन प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. १७ डिसेंबरला दुसऱ्या फेरीसाठी तात्पूरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्यावर १८ ते २० डिसेंबरपर्यंत आक्षेप घेता येईल. २२ तारखेला तात्पुरते अलॉटमेंट दिले जाईल. २३ ते २६ पर्यंत दिलेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नक्की करावा लागणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त राहिलेल्या जागांची यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध होईल. २८ ते ३० डिसेंबर दरम्यान ऑप्शन देता येईल. ३ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करणे गरजेचे आहे. ६ ते १० जानेवारी दरम्यान स्पॉट ऍडमिशनची मुदत आहे. राज्यात ‘बी. फार्मसी’, ‘फार्म. डी’ या औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ५९ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांचे प्रवेश आता सुरळीत होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.