आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथ पुरस्कार:औरंगाबादचे लेखक रमेश रावळकर यांच्या टिश्यू पेपर कादंबरीस बी. रघुनाथ पुरस्कार जाहीर

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्मय प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार दिले जातात. साहित्य परिषदेच्या वतीने शुक्रवारी 2022 चे ग्रंथपुरस्कार परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहिर केले. यात कथा आणि कादंबरीसाठी देण्यात येणाऱ्या बी.रघुनाथ पुरस्कारासाठी यंदा औरंगाबाद शहरातील रमेश रावळकर यांच्या "टिश्यू पेपर' कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

रा.ज. देशमुख स्मृतिपुरस्कार "ग्रंथ तुमच्या दारी ' या चळवळीसाठी नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचक चळवळीशी संबंधित प्रयोग करणारे संचालक विनायक रानडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यावेळी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष के.एस. अतकरे, डॉ.रामचंद्र काळुंखे, डॉ. कैलास इंगळे यांची उपस्थिती होती.

नरेंद्र मोहरीर वाड्मय पुरस्कारासाठी प्रा. मिलिंद कसबे यांच्या "साहित्य आणि लोककला: मार्क्स- आंबेडकरी दिशा' या ग्रंथाची निवड करण्यात आली. हा पुरस्कार कला, सौँदर्यशास्त्र, इतिहास आणि संशोधन यातील उत्कृष्ट ग्रंथास देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप पाच हजार रुपये आहे.

कळंब येथील केदार काळवणे यांच्या "कल आणि कस' या समीक्षाग्रंथस प्राचार्य म.भि. चिटणीस वाड्मय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सोलापूरच्या कविता मुरुमकर यांच्या "उसवायचाय तुझा पाषाण ' या कवितासंग्रहाची निवड कै. कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कारासाठी लातूर जिल्हयातील प्रा. अनिरुद्ध जाधव यांच्या "मनासी संवाद' या आत्मचरित्राची निवड झाली आहे.

बीडच्या डॉ. सतीश साळुंके यांच्या "मराठवाड्यातील नाट्यपरंपरा' या संशोधनपर ग्रंथाची निवड ही कुमार देशमुख नाट्यपुरस्कारासाठी झाली आहे. या पुरस्कारांचे स्वरुप तीन हजार रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...