आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयजे क्रीडा महोत्सव:बाबा बिल्डर्स संघाचा विजय; सामनावीर विनायक भोईची अर्धशतकी खेळी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयोजित आयजे क्रीडा महोत्सव अंतर्गत खासदार चषक स्पर्धेत बाबा बिल्डर्स संघाने शानदार विजय मिळवला. आमखास मैदानावर झालेल्या सामन्यात बाबा संघाने एमआयटी क्युस्ट एक्सलन्स संघावर 26 धावांनी मात केली. अष्टपैलू विनायक भोईर (77 धावा, 2 बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून एमआयटी संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बाबा संघाने 15 षटकांत 3 बाद 178 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यात सलामीवीर आकाश बोर्डेने 16 धावा केल्या. कर्णधार सलमान अहमदने 24 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकार लगावत 30 धावा काढल्या. आकाश व सलमान जोडीने 45 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या कय्युमने फटकेबाजी करत 16 चेंडूंत 3 चौकार व २ षटकार मारत नाबाद 41 धावा कुटल्या. आदित्य राजहंस 10 धावा करुन परतला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या विनायक भोईरने अर्धशतकी खेळी करत संघाचा धावफलक वेगाने हलता ठेवला. त्याने 27 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार आणि 7 उत्तुंग षटकारांची बरसात करत 77 एमआयटीच्या राजू ताकवाले, राजू परचक्के आणि अष्टपैलू वैभव चौगुले यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

वैभवचे अर्धशतक ठरले व्यर्थ

प्रत्युत्तरात एमआयटी संघ निर्धारित षटकांत 8 बाद 152 धावा करू शकला. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सतिश भुंगजे भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार शशिकांत पवार अवघ्या ४ धावांवर आल्यापावली तंबूत परतला. धीरज थोरतही (13) मोठी खेळी करु शकला नाही. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अष्टपैलू खेळाडू वैभव चौगुलेेचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.

80 धावांची खेळी

वैभवने 38 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 7 षटकार खेचत नाबाद 80 धावांची खेळी केली. अनुभव खेळाडू इशांत रायही अवघ्या ६ धावांवर परतला. अमित टाकने 15 धावांचे योगदान दिले. बाबाकडून अब्दुल समीने 27 धावा देत 4 फलंदाजांना तंबूत पाठवले. शेख अल्ताफने 21 धावांत 2 आणि विनायक भोईरने 24 धावांत 2 गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...