आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनम्र अभिवादन:नियमित योगा, वॉकिंग अन् स्प्रिंग चेस्ट एक्स्पांडरचा व्यायाम करायचे बाबासाहेब...  

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • बाबासाहेबांनी ब्रिटिश अर्थमंत्र्यांना स्वत: कुकिंग करून स्नेहभोज दिला

शेखर मगर

नियमित योगा, वॉकिंग, स्प्रिंग चेस्ट एक्स्पांडरद्वारे छाती अन् हृदयाचा व्यायाम करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: निरोगी राहत असत. खवय्ये असले तरी संतुलित आहार घेऊन पचनसंस्थाही नेहमी सक्षम ठेवायचे. बाबासाहेब स्वत:च्या आरोग्याविषयी खूप अलर्ट होते. खास प्रसंगी ते स्वत:ही कुकिंग करून पाहुण्यांना जेवू घालायचे. त्यांचे सहकारी देवी दयाल यांनी ‘ए डेली रुटीन ऑफ डॉ. आंबेडकर’ नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथामुळे आपल्याला बाबासाहेबांच्या दिनचर्येची प्रचिती येते. ‘कोरोनो’च्या दहशतीत यंदा बाबासाहेबांची १२९ वी जयंती साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने बाबासाहेबांच्या ‘हेल्थ प्रिपरेशन’चा थोडक्यात आढावा घेतला.

सकाळी ७ वाजता बाबासाहेब झोपेतून उठले की अंथरुणावरच वर्तमानपत्र वाचायचे. फ्रेश झाल्यावर सकाळी बंगल्यातील गार्डनमध्ये १० ते १५ मिनिटे वॉकिंग करणे, बेडरूममध्ये १५ मिनिटे योगासने, त्यानंतर छाती फुगवण्यासाठी वा छातीच्या व्यायामासाठी बाबासाहेबांकडे एक ‘स्प्रिंग चेस्ट एक्स्पांडर’ मशीन होती. त्यावरही थोडा वेळ व्यायाम करायचे. त्यांच्याकडे लाकडी गदांचा ‘सेट’ होता. पण नेहमी वापरत नव्हते. नाष्ट्याच्या टेबलवर पुन्हा राहिलेले वर्तमानपत्र वाचायचे. २ ब्रेड टोस्ट, २ बॉइल अंडी आणि चहा एवढा त्यांचा सकाळचा नाष्टा होता. नाष्टा करताना महत्त्वाच्या बातम्यांना लाल पेन्सिलने मार्किंग करून ठेवत असत. त्यांची कात्रणे करून संग्रही ठेवण्याचे काम देवी दयाल करायचे. दुपारी दीड वाजता अतिशय साधे जेवण घ्यायचे. बाबासाहेब ज्याप्रमाणे सनातनी व्यवस्थेशी दोन हात करायचे त्याचप्रमाणे मधुमेह आणि संधिवातसारख्या विकारांशीही झुंज देत होते. मधुमेह नियंत्रित असावा म्हणून बाबासाहेब जेवणापूर्वी ‘इन्सुलिन’चे इंजेक्शन घेत होते. दुपारच्या जेवणात दोन वाट्या व्हेजिटेबल्स, गुजराती कढी, चपाती किंवा बाजरीची भाकरी आणि फळे नेहमी असायचे. अधूनमधून उकडलेला मुळा, मद्रासी उतप्पाचाही बाबासाहेबांची फर्माइश असायची. आठवड्यातून दोन वेळा मटणसूपवर ताव मारत होते. संध्याकाळी मात्र अतिशय संतुुलित आहार घेऊन पचनसंस्थेची काळजी घेत होते. बाबासाहेब म्हणायचे, ‘क्लिअरर युवर स्टमक, दी क्लिअरर युवर माइंड, दोज हु डु मेंटल वर्क शूड अल्वेज क्लिअर स्टमक’ त्यामुळं काय खावं, कधी खावं, कसं खावं, किती खावं याविषयी ते नेहमी अलर्ट असायचे. रात्रीच्या जेवणानंतर बंगल्यातील हिरवळीवर अनवाणी चालण्याने त्यांना आनंद मिळत असे. 

ब्रिटिश अर्थमंत्र्यांना स्वत: कुकिंग करून स्नेहभोज दिला

बाबासाहेबांना कुकिंगची भारी आवड होती, हे अनेकांना माहिती नाहीये. बऱ्याचदा पालेभाज्या खरेदीसाठीही बाबासाहेब स्वत: दिल्लीतील गाले मार्केटला जायचे. त्यांच्यासमवेत मोदी नावाचे त्यांचे खासगी सचिव असायचे. ३० ऑक्टोबर १९४४ रोजी ब्रिटिश अर्थमंत्री दिल्ली येथील बाबासाहेबांच्या निवासस्थानी जेवणासाठी आले होते. तत्पूर्वी बाबासाहेबांनी स्वत: बाजारातून व्हेजिटेबल्स विकत घेतल्या. स्वयंपाकघरात बाबासाहेबांनीच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार केल्या अन् ब्रिटिश मंत्र्यांसह त्यांच्यासमवेत आलेल्या सर्व शिष्टमंडळाला स्नेहभोजन दिले. देवी दयाल यांनी पुस्तकात उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेबांनी शिष्टमंडळाला सांगितले. ‘मी कुकिंग माझी पत्नी रामूकडून अर्थात रमाईकडून शिकलो’ - डॉ. अरविंद गायकवाड, अभ्यासक

बातम्या आणखी आहेत...