आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:भारताचा मूळ धम्म म्हणून बाबासाहेबांनी तो स्वीकारला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौतम बुद्धाने प्रज्ञा करुणेतून दु:खमुक्तीचा मार्ग सांगितला. आदर्श भिक्षू कसा असावा याची आचारसंहिता निर्माण केली. सर्वसामान्य लोकांना बुद्धांनी आपले तत्त्वज्ञान साध्या व सोप्या भाषेत सांगितले. त्यामुळे आधुनिक कालखंडात ईश्वरवादाला नाकारून बौद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारला, असे प्रतिपादन पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागाचे डॉ. प्रदीप गोखले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गौतम बुद्ध अभ्यास केंद्रातर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी ‘बौद्ध तत्त्वज्ञानातील स्थित्यंतरेे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म’ विषयावर डॉ. गोखले बोलत हाेते. अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. संजय मून यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. रेखा मेश्राम यांनी सूत्रसंचालन केले. आभार डॉ. संजय पाईकराव यांनी मानले. या कार्यक्रमाला यशवंत भंडारे, प्राचार्य यशवंत खडसे, डॉ. प्रज्ञा साळवे, डॉ. क्षमा खोब्रागडे, डॉ. किशोर सूर्यवंशी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...