आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान मुले दिवसभर घरात धिंगाणा घालतात, रात्री झोपेत अस्ताव्यस्त झोपून आई-वडिलांना त्रस्त करतात. लहान मुले हात-पाय मारतात अशी तक्रार नातेवाईक करतात. लेखिका जेसिका ग्रॉस म्हणतात,‘माझी ५ वर्षांची मुलगी अस्ताव्यस्त झोपते. सकाळी उठून पाहिले की ती आपल्या मूळ स्थितीपेक्षा १८० अंशांनी किंवा त्यापेक्षा जास्त वळालेली असते. तिचे डोके खाली आणि पाय उशीवर असतात. अनेकदा ती अर्धी बेडवर आणि अर्धी बेडच्या खाली असते. सर्वात भयानक म्हणजे तिचे झोपेत लाथा मारणे, त्यामुळे मला अनेकदा जखमाही झाल्या आहेत. ‘मुलीच्या या सवयीमुळे मला तीन तज्ज्ञांशी चर्चा करावी लागली. लहान मुले प्रौढांच्या किंवा मोठ्या मुलांच्या तुलनेत एवढे अस्ताव्यस्त का झोपतात, असा प्रश्न मी त्यांना विचारला.’
अल्बर्ट आइन्स्टाइन कॉलेज ऑफ मेडिसिनमध्ये न्यूरॉलॉजी, सायकियाट्री अँड बिहेविअरल सायन्स विभागाच्या सहायक प्रा. शेल्बी हॅरिस म्हणाल्या, ‘झोपेत फिरणे बहुतांश मुलांसाठी सामान्य असते. प्रौढांसह सर्व लोक झोपेच्या चक्रामध्ये जागे होतात. डोके उशीवर आणि पाय खालच्या बाजूने करून झोपणे वयोमानानुसार शिकतो. त्यामुळे झोपेच्या चक्रात जेव्हा मुले जागी होतात तेव्हा ते सर्वात आरामदायक स्थितीसाठी शरीर हलवतात. अशात डोक्याखाली उशी आहे की नाही,हे पाहिले जात नाही.’ अमेरिकन अकॅडमीत स्लीप मेडिसिनचे फेलो श्निबर्ग म्हणाले, ‘लहान मुले झोपेसाठी काही गैरपारंपरिक पद्धती विकसित करतात. त्यांच्या दिनचर्येत पायाने लाथ मारणे, पाय झाडणे किंवा शरीर हलवण्याचा समावेश असू शकतो. याची झोपेत पुनरावृत्ती होते.’ येल न्यू हेवन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक स्लीप मेडिसिन प्रोग्रामचे संचालक डॉ. क्रेग कॅनापारी म्हणाले, ‘मूल खूप अस्ताव्यस्त पद्धतीने झोपत असेल तर बालरोगतज्ज्ञांशी अवश्य बोलले पाहिजे.’
मुलांचे असे झोपणे सामान्य आहे की समस्या याबाबत बालरोगतज्ज्ञांशी बोला
डॉ. कॅनापारी म्हणतात, ‘मूल वारंवार जागे होत असेल आणि नंतर मुश्किलीने झोपत असेल तर त्याला जास्त वेळ बिछान्यावर घालवण्याची इच्छा असावी. मूल सकाळी चिडत असेल किंवा दिवसा त्याच्या वर्तणुकीबाबत समस्या असेल तर चांगली झोप न लागण्याची समस्या असू शकते. घोरणे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियाचा संकेत असू शकतो. पायात वेदनेची तक्रार रेस्टलेस लेग सिंड्रोमचा संकेत असू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.