आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकीकडे महामार्ग आणि इतर एक्स्प्रेस वेचे काम चालू आहे. मात्र शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे अजूनही प्रलंबित आहेत. यात भीमनगर-भावसिंगपुरा भागातील रस्ता न झाल्याने या मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला जाण्यासाठी सोयीचा रस्ता राहिलेला नाही. त्यामुळे हा रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. संभाजी चौक ते भावसिंगपुरा स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. कच्चा रस्ता, दगडधोंडे व मातीचा खच. यामुळे सामान्यांना जाणे-येणे अवघड झाले आहे. तसेच पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागते. या भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून येथे पावसाळ्यात अंत्ययात्रेला जाता येत नाही. या भागात कचरा डेपोच्या रूपाने कायमची महारोगराई दिली.
प्रशासन लक्ष देत नाही भीमनगर, भावसिंगपुरा लोकांसाठी स्मशानभूमी आहे. मात्र, येथे जाण्यास रस्ता नसल्याने अनेक अडचणी येतात. -राज चौथमल, रहिवासी
वाहनधारकांना अडचणी रस्त्याने वावरताना नागरिकांच्या वाहनांचे विविध पार्ट्स खराब होतात. दुचाकीस्वारांना मणक्यांचे आजार होत आहेत. -अतीश वानखेडे, रहिवासी
मनपा प्रशासनाने लक्ष द्यावे संभाजी चौक ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मनपा लक्ष देत नाही. या रस्त्यावर पथदिवे नसून रात्री स्मशानभूमीत जातानासुद्धा अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे मनपाने लक्ष दिले पाहिजे. -रमेश पुरी, रहिवासी
वाहनधारकांना मरणयातना भीमनगर-भावसिंगपुरा या भागातील संभाजी चौक ते स्मशानभूमीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील वाहनधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून मरणयातना सोसाव्या लागत आहेत. -अॅड. संतोष लोखंडे, रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.