आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागडे विधानसभेची जागा काही सोडणार नाही:सोबत बसलो म्हणजे मी शांत बसणार नाही; कल्याण काळेंची हरीभाऊ बागडेंवर टीका

संतोष देशमुख । औरंगाबाद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुध संघाचा मी सभासद आहे. वार्षिक सभेचे नियमंत्र होते. मंचावर बसण्यासाठी मला सांगण्यात आले. त्यानुसार अध्यक्ष हरिभाऊ बागडे व मी जवळ जवळ बसलो. याचा अर्थ मी संघाच्या गैरकारभारावर गप्प बसणार असा होत नाही. तसेच बागडे विधानसभेची जागा मला सोडणार नाहीत. राजकीय प्रश्नांवर असे उत्तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी दिले.

दुध संघाच्या अधिमंडळाची वार्षिक सभा शनिवारी पार पडली. सभेत डॉ. काळे व बागडे मांडीला मांडी लावून बसले होते. दुध उत्पादकांचे प्रश्न एकुण घेतले जात नव्हते. यामुळे संतप्त झालेले दुध उत्पादक नंदू जाधव यांनी काळे व बागडे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, तुम्ही पहिले निवडणूक लढवली नाही व आता मांडीला मांडी लावून बसलात.

पण आमचे प्रश्न पहिले एकुण त्यावर निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी केली. याला उत्तर देताना डॉ. काळे म्हणाले की, तुम्हाला इमांदराने सांगतो, पॅनल उभ करणार होतो. पण ज्येष्ठ नेते व मंत्री संदीपान भुमरे, बागडे यांनी सहकारी संस्थेची निवडणूक असून आपण सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांच्या शब्दांला मान देवून मी पॅनल उभे केले नाही. मात्र, दुध संघाची वाईट अवस्था मी पाहू शकत नाही. 2015 नंतर दुध संघ सतत तोट्यात चालला आहे. गतवर्षी निवडणूक पूर्वी 30 लाख रुपये नफ्यात असलेला संघ निवडणुकीनंतर 9 लाख इतका कमी नफा का होतो? असा प्रश्न उपस्थित करून संघाचे अध्यक्ष बागडेंच्याच नेतृत्वावर घाव घातला. तसेच दुध येण्यात घट का झाली? याचाही विचार करा? खासगी दुध संस्था 36 रुपये प्रतिलिटर भाव देत आहेत. तुम्ही 34 देता तेव्हा दोन रुपये तातडीने भाववाढ द्यावी, अशी सर्वांच्या वतीने मागणी केली. याचे शेतकऱ्यांनी समर्थन केले. तसेच वार्षिक संघाच्या खर्चावर सडकून टिका केली. विषय पत्रिकेतील काही प्रश्नही नामंजूर असल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले.

शेतकऱ्यांचा सभात्याग

दुध येणे घटले असताना‌ दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. हे कस साध्य झाले? यात गडबड दिसते, असा प्रश्न शिवाजी बनकर, डॉ. काळे, नंदू जाधव यांच्यासह आदी संघाच्या सभासदांनी उपस्थित केला होता. यावर समाधानकारक उत्तर मिळाले नाही. उलट बागडे विषय क्रमांक दोन मंजुर म्हणत होते तर सभासद नाही म्हणत होते. अशाच प्रकारे खर्च व उत्पन्नावरील प्रश्न टाळले जात होते व समाधानकारक उत्तरही मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सभात्याग केला.

राजकारण कराल तर हा संघही डुबेल

राजकारण कराल तर हा संघही डुबेल मराठवाड्यातील एकमेव दुध संघ चांगल्या स्थितीत आहे. संघाच्या दुध संकलन केंद्रावरून दुसऱ्या खासगी संस्थांना दुध विक्री करता येत नाही तरी ते केले जात आहे. काळे यांच्या गावापरिसरातील चार दुध संकलन केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे दुध संकलनात घट झाली.

तर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी तंत्रज्ञान बसवले आहे. कर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे खर्च अधिक व नफा कमी झाला. पण नफा कमावणे संघाचे उद्दिष्ट नाहीच. हे पहिले लक्षात घ्यावे. आपला संघ कसाबसा तग धरून आहे. यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. प्रत्यक्षात राजकारण होत असून यामुळे हा संघही डुबण्यास वेळ लागणार नाही, असा निर्वाणीचा इशारा बागडे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...