आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामीन नामंजूर:प्रियशरन महाराजांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीचा जामीन नामंजूर

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडसावंगी रोडवरील साताळा (ता. फुलंब्री) येथील आश्रमात घुसून प्रियशरन महाराज ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर (६१) यांना मारहाण करुन धमकी दिल्या प्रकरणात मकोकाअंतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपी करणसिंग ऊर्फ करण ऊर्फ कन्हैया ऊर्फ कन्नू महादू ऊर्फ महादेव सोळंकी (४१, रा. सांवगी) याने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एच. केळुसकर यांनी नामंजूर केला.

प्रकरणात प्रियशरन महाराजांनी फिर्याद दिली. महाराजांचा साताळा येथे राधागोविंद सेवा मिशन नावाने आश्रम आहे. ११ नोव्हेंबर २०२० रोजी मध्यरात्रीनंतर त्यांना मारहाण झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...