आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजूर:आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पत्नीसह पाच जणांना जामीन

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मानसिक त्रासातून नोट लिहून तसेच मोबाइलवर लाइव्‍ह व्‍हिडिओ करून आत्‍महत्‍या केल्याप्रकरणी दाखल गुन्‍ह्यात पत्‍नीसह पाच जणांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. एम. आगरकर यांनी मंजूर केला. राणी विनोद ससाने, गोरख साबळे, विशाल साबळे, अनिता साबळे आणि कुणाल साबळे अशी आरोपींची नावे असून त्‍यांच्‍या वतीने अॅड. प्रकाश उंटवाला यांनी काम पाहिले.मृत विनोद कचरू ससाने यांचा भाऊ संतोष ससाने (३४, रा. फुलेनगर, उस्‍मानपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विनोद आणि राणी यांचा २८ मे २०१९ रोजी लग्न झाले. काही महिने चांगले नांदल्यानंतर राणीने पतीला माहेरी राहण्‍यासाठी तगादा लावला. या वादातून त्‍यांची नेहमी भांडणे होत होती. २३ मार्च २०२२ रोजी विनोदने आत्महत्या केली. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल आहे.

बातम्या आणखी आहेत...