आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतापनगर परिसरातील मैदानाजवळ १४ जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडवून रस्त्याने जाणाऱ्यांना चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याच्या प्रकरणातील दोन आरोपींनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जगदाळे यांनी नामंजूर केला. ननकू समयदीन यादव (५१, रा. जिजामातानगर रमाबाई चाळ, वरळी, मुंबई) आणि साहील मजमुल खान (३०, रा. खोलीवाडा चाळ, वडाळा, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी हे परराज्यातील मूळ रहिवासी आहेत. त्यांना जामीन दिल्यास पसार होण्याची शक्यता आहे. आरोपी पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर फिर्यादी व साक्षीदारांना आरोपी धमकी देण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याने सहायक सरकारी लोकाभियोक्ता नामदेव पवार आणि रणजितसिंह देवरे यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.