आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक उत्सव:अब्दीमंडीच्या मंदिरात मिरवणुकीने बालाजी कल्याणक उत्सव साजरा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्दीमंडी येथील बालाजी मंदिरात शुक्रवारी भगवान बालाजीचा कल्याणक उत्सव अभिषेक, पालखी मिरवणुकीने साजरा करण्यात आला. श्री पंचमंडळी माहेश्वरी यांच्या वतीने मार्गशीर्ष महिन्यात बालाजी मंदिराची मूर्ती स्थापन करण्यात आली. या वार्षिक उत्सवानिमित्ताने सकाळी ६.३० वाजता अभिषेक करण्यात आला. बालाजीची शृंगार आरती करण्यात आली. येवला येथून खास प्रकारचे पंचवस्त्र आणण्यात आले. चंदन, विभूती, दिव्यांची पंचआरती केली.

उत्सवमूर्तीची मिरवणूक : आरतीनंतर बालाजी, पद्मावती, महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तीला श्रीसूक्त पठणाने सहस्रधारा केली. या वेळी मिश्रीलाल तोष्णीवाल, जवाहरलाल सोमाणी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...