आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:आमदार संदिप क्षीरसागरांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षीरसागर यांचे समर्थक तथा बीड नगर पालिकेचे नगरसेवक बाळासाहेब गुंजाळ यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले आहे.

बाळासाहेब गुंजाळ यांनी गेल्या दहा वर्षापासून पेठ बीड भागात सिंहासनाधिश ग्रुपच्या माध्यमातून युवकांचे मोठे संघटन निर्माण केलेले आहे. समाजकारणातून आलेल्या गुंजाळ यांनी राजकारणात सक्रिय होत गत पंचवार्षिकमध्ये नगरसेवक पद भुषविले होते. सध्या त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. बाळासाहेब गुंजाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक होते. नगरसेवक गुंजाळ यांनी आपल्या दहा वर्षाच्या सामाजिक जीवनात वंचित,उपेक्षीत आणि सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे काम केलेले आहे. मात्र काल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर,जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. नगरसेवक गुंजाळ यांच्या प्रवेशाने पेठ बीड भागात पुन्हा एकदा शिवसेनेचे भगवे वादळ निर्माण होणार आहे, अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुंजाळ यांचे स्वागत केले आहे.

बातम्या आणखी आहेत...