आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्ग:बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 'समृद्धी’ महामार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अवघड, इंटरचेंजेसची कामे अपूर्ण

औरंगाबाद / नामदेव खेडकर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिर्डी ते नागपूरदरम्यान ९० टक्के काम पूर्ण; पूल,

कोरोनामुळे समृद्धी महामार्गाचे कामही लांबणीवर पडले. ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत असताना आता २०२२ उजाडले तरीही अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण कामात मोठे पूल, इंटचेंजेसच्या कामांचा समावेश आहे. असे असतानाही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी (२३ जानेवारी) शिर्डी ते नागपूर या टप्प्याचे उद्घाटन करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, अपूर्ण कामे व कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त साधणे शक्य नसून महाराष्ट्रदिनी (१ मे) हे उद्घाटन होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

नागपूर ते मुंबई असा ७०० किमी लांबीचा समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचे काम जवळपास ९० टक्के झाले आहे. ‘पीक्यूसी’ अर्थात सिमेंट काँक्रीटचा ट्रॅक पूर्ण झालेला आहे. मात्र, जिथे मोठे पूल आहेत, तिथे पीक्यूसी अपूर्ण आहे. शिर्डी ते वैजापूरदरम्यान गोदावरी नदी ओलांडण्यासाठी मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाचे काम अद्याप बाकी आहे. त्यामुळे येथून वाहतूक सुरू करणे शक्य नाही. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरनजीक पुलांची कामे बाकी आहेत. त्यामुळे वाहतूक सुरू करणे शक्य नाही. या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ऑगस्ट २०२१ पर्यंतची मुदत होती. मात्र, कोरोनामुळे शक्य झाले नाही.

शिवाय शिर्डी ते मुंबईपर्यंत अद्यापही काही भागात भूसंपादनाचा तिढा कायम आहे. त्यामुळे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात पूर्ण ट्रॅक होण्यासाठी पुढील एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. दरम्यान, गतवर्षी १ मे राेजी शिर्डी ते नागपूरपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे नियोजन केले होते. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरद्वारे या रस्त्याची हवाई पाहणी करून १ मेपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदार कंपन्या आणि एमएसआरडीसीला दिल्या होत्या. मात्र, कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे हे शक्य झाले नव्हते. या मार्गावर प्रत्यक्ष वाहने धावण्याचा ट्रॅक पूर्ण झाला आहे. फक्त, जिथे मोठे पूल आहेत, तिथे ट्रॅक अधुरा आहे. यात शिर्डीजवळ गोदावरीवरील एक मोठा पूल आणि विदर्भात बुलडाणा जिल्ह्यातील पुलांची कामे अपूर्ण आहेत. शिर्डी ते नागपूर अशी वाहने धावायला समृद्धीच्या आजूबाजूच्या रस्त्यांचा वापर करावा लागेल. इंटरचेंजेसची कामेही सध्या तरी अपूर्णच आहेत.

जिथे काम अपूर्ण, तिथे पर्यायी रस्त्यांचा वापर?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जानेवारी रोजी शिर्डी ते नागपूर या टप्प्यावर वाहतूक सुरू करायची असेल तर जिथे अद्याप काम अपूर्ण आहे, अशा ठिकाणी पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागेल. उदा. गोदावरी नदीवरील पूल बांधणे बाकी आहे. त्यामुळे नागपूरकडून शिर्डीकडे आलेली वाहने वैजापूर तालुक्यातून जुन्या शिर्डी रस्त्याने वळवली जातील.

बातम्या आणखी आहेत...