आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाणांचे मत समजून घ्यावे लागणार:बाळासाहेब थोरात; म्हणाले - सरकारचे काय सुरू आहे, काहीच समजेना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद असल्याचं समोर आले होते. याबाबत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विचारले असता मला पृथ्वीराज चव्हाण यांचे मत समजून घ्यावे लागेल अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी सुभेदारी विश्राम गृहवर घेण्यात आलेल्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

यावेळी थोरात यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या संदर्भातील नियोजना संदर्भात माहिती दिली.देशात केवळ भेदाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या यात्रेच्या माध्यमातून भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबाद मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

राहुल गांधींच्या दौऱ्याचे निमित्ताने बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी सुभेदार विश्रामदावार पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी थोरात यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे बाबत माहिती सांगितली यावेळी जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यात्रेचे औरंगाबादचे समन्वयक नामदेव पवार तसेच माजी अध्यक्ष अनिल पटेल शहराध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र अभुत पूर्व प्रतिसाद मिळेल

थोरात म्हणाले की महाराष्ट्रा सारख्य पूरोगामी राज्यात यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल असा दावाही थोरात यांनी केला आहे. तसेच सात तारखेला राहुल गांधी मराठवाड्याच्या यात्रे ची सुरुवात नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मधून करणार आहेत. त्यानंतर हिंगोली वाशिम बुलढाणा या जिल्ह्यात जाणार आहे.

सरकारचे काय चाललंय कोणालाच कळत नाही

राज्य सरकारच्या एकूण कारभाराबाबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की सध्या राज्य सरकारची नेमके काय सुरू आहे हे कोणालाच कळत नाही. उद्योग राज्याबाहेर जात असून इथे युवकांनी केवळ दहीहांडी खेळायची का असा सवाल त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...