आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो यात्रेचे नियोजन:माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला आक्षेप, आक्षेपाला बाळासाहेब थोरातांनी दिली बगल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुभाष झांबड बाळासाहेबांच्या शिवसेनेत जातील असे वाटत नसल्याचा दावा

काँग्रेसमधील जी-२३ गटाचे प्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण झालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या नियोजनाबाबत आक्षेप, प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याविषयीच्या प्रश्नाला मंगळवारी (१ नोव्हेंबर) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बगल दिली. मला आधी पृथ्वीराज चव्हाण यांचे मत समजून घ्यावे लागेल, असे ते म्हणाले.

सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत थोरात राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, उद्योग राज्याबाहेर जात असल्याने युवकांनी केवळ दहीहंडी खेळायची का? या सरकारचे नेमके काय सुरू आहे, हेच कळत नाही. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुभाष झांबड बाळासाहेबांची शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती दिली आहे. याविषयी थोरात म्हणाले की, मला वाटत नाही झांबड असे काही करतील.

बातम्या आणखी आहेत...