आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यतिथी उत्सव:बाळकृष्ण महाराजांचा पुण्यतिथी उत्सव आजपासून

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाळकृष्ण महाराज यांचा १२४ व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त ७ ऑक्टोबरपासून हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगपुरा येथील जिल्हा परिषद रस्त्यावरील बाळकृष्ण महाराज समाधी मंदिर परिसरात १७ ऑक्टोबरपर्यंत हा सोहळा चालेल.

यामध्ये पहिल्या दिवशी लखामपूरचे दादा वायसळ, ८ ऑक्टोबर रोजी गोंदी येथील प्रदीप मुळे, ९ ऑक्टोबरला ज. मो. हर्सूलकर आणि चंद्रकांत पिंपळे यांचे दत्त पूर्णाती भजन होईल. १० ऑक्टोबरला कृष्णा आरगडे, ११ ऑक्टोबरला सविता मुळे, १२ ऑक्टोबरला अरविंद उपाध्ये, १३ ऑक्टोबरला पुण्यतिथी सोहळा होईल. १४ ऑक्टोबरला काकड आरती आणि पालखी सोहळा होईल.

१५ ऑक्टोबरला आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ऑक्टोबरला मनोहर दीक्षित यांचे कीर्तन आणि गोपालकाला होईल. शेवटच्या दिवशी प्रक्षाळपूजेने सांगता होईल, असे आवाहन विश्वस्त प्रथमेश जोशी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...