आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागातील मास्टर परफार्मिंग आर्ट्सच्या प्रथम सत्र विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकचा भाग असलेल्या ४७ व्या एकांकिका महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी (२ जानेवारी) सायंकाळी एमजीएम खासगी विद्यापीठातील नाट्य-चित्रपट विभागाचे प्रमुख डॉ. शिव कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी अविष्कार महोत्सवाचे उदघाट्न करण्यात येणार आहे.
पहिल्या दिवशी गोपाल वाघमारे आणि अश्विनी देहाडे यांनी दिग्दर्शित केलेले ‘अल्पभुधारक’ आणि इयान खान यांचे भेडिये नाटक सादर करण्यात आले. मंगळवारी (३ जानेवारी) शाम डुकरे यांचे ‘खटला’, संकेत निकम-ऋषिकेश तुरई यांचे ‘मानस’, एस. एन. नवले-तेजस कवर यांचे ‘व्हय मी’ आणि ‘डाग’ या एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.
बुधवारी (४ जानेवारी) अशोक पागल, अश्वजीत भित्रे यांचे ‘कॅनव्हास की मौत’, अक्षय राठोड-मानसी राठोड-पंकज गिरी यांचे मुक्ती तर गिरधर पांडे आणि पवन खरात यांचे ‘पत्र’ एकांकिका सादर होईल. गुरूवारी (५ जानेवारीला ) अक्षय राठोड यांचे ‘आदिम’, शेखर ताम्हणे-संगीता नाटकर यांचे ‘कलकी’ तर नंदु वाघमारे यांचे ‘कारखाना’ सादर होईल. शुक्रवारी (६ जानेवारी) अंतोन चेखव-रूमा भामरी यांचे ‘सर्जरी’, अजय पाटील-विठ्ठल बोबडे यांचे ‘लज्जा द्यावी सोडून’ आणि संतोष शेट्ये यांचे ‘माय’ होणार आहे. शनिवारी (७ जानेवारी) दुर्गेश्वरी अंभोरे यांचे दुर्गा, सुमीत तौर-आदित्य इंगळे यांचे ‘भारतीय’, सुदाम केंद्रे यांचे ‘पछाडलेला’ तर प्रदीप खाडीलकर-नयना टेंभुर्णे यांचे शवागाराचा चौकीदार एकांकिका सादर होणार आहे. सर्व एकांकिका सायंकाळी साडे सहा वाजता सादर होतील.
‘आविष्कार’चे आज उद्घाटन
‘आविष्कार’ महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (३ जानेवारी) सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. ‘एंडुरन्स’चे प्रकल्प प्रमुख राजेंद्रकुमार पवार यांच्या हस्ते उद्घाटन होईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेस्थानी राहणार आहेत. नाटयगृहात हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवात चार विद्याशाखेच्या सहा कॅटेगिरीतील संशोधक सहभागी होणार आहेत. ७७ महाविद्यालयांचे ३१० संघांनी सहभाग नोंदविला आहे.
२९३ पुरुष तर २२० महिला असा ५१३ जणांचा सहभाग असणार आहे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसांच्या महोत्सवाचा बुधवारी ( ४ जानेवारी) दुपारी पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.