आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • BAMU Univercity Admission Update | Bamu Exam Update Aurangabad | 4 Thousand Students Will Participate In The Admission Process For Various 68 Courses In 4 Faculties

विद्यापीठाची पद्युत्तर अभ्यासक्रमाची गुणवत्ता यादी जाहीर:68 अभ्यासक्रमांसाठी 4 हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि उस्मानाबाद उपपरिसरातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यापीठ क्षेत्रातील 3 हजार 838 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवार 29 जाहीर करण्यात आली. तर इतर विद्यापीठ कोट्यातील अंतिम यादीही जाहीर करण्यात आली आहे. चार विद्याशाखांतील विविध 68 अभ्यासक्रमांसाठी जवळपास चार हजार विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. तरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह प्रवेशासाठी उपस्थित राहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विद्यापीठ प्रशासनातर्फे विद्यापीठ परिसर व उस्मानाबाद येथील उपपरिसरातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 2022-23 शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू आहे. मात्र पदवी अभ्यासक्रमांच्या निकालामुळे ही प्रक्रिया लांबली होती. प्रक्रियेत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील व इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन फेरीद्वारे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येणार आहेत. इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीची फेरी 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. ज्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा, मानवव्य विद्याशाखा, वाणिज्य विद्याशाखा आणि आंतर विद्याशाखांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश फेऱ्या 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान होणार आहेत.

28 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यातील विविध चार विद्याशाखांसाठी 3 हजार 838 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 2 हजार 133 विद्यार्थी विज्ञान विद्याशाखेला आहेत. प्रवेश प्रक्रियेत यंदा ऑनलाइन नोंदणी, शुल्क भरूनही अपूर्ण असलेल्या अर्जांची संख्या 4 हजार 48 होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांसह नवीन अर्ज भरण्यासाठी 28 ऑगस्टपर्यंत विद्यापीठाने मुदत दिली होती. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले, नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याचे सांगण्यात आले. अपूर्ण अर्जांची संख्या 2 हजार 874 एवढी आहे. 1 सप्टेंबरला इतर विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया होणार असून त्यासाठी बाराशे विद्यार्थी असणार आहेत.

विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेला सर्वाधिक विद्यार्थी

विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांसाठी सर्वाधिक 2 हजार 133 अर्ज आहेत. विद्याशाखेत 29 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यानंतर सर्वाधिक मानवव्य विज्ञान विद्याशाखेतील 20 अभ्यासक्रमासाठी 966 अर्ज आहेत. आंतरविद्या शाखेतील 11 अभ्यासक्रमासाठी 493 विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत. वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेत 3 अभ्यासक्रमांना प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी 246 अर्ज आलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...