आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटयशास्त्र विभागातच चित्रपटाचा अभ्यासक्रम शिकवा:विद्यापीठाच्या एकांकिका महोत्सवात दिग्दर्शक शिवदर्शन कदम यांचे प्रतिपादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नाट्य सृष्टीने चित्रपट व दुरचित्रवाणी मालिकांना अनेक नामवंत कलावंत दिले आहेत. बदलत्या काळानूसार या विभागात चित्रपटासंदर्भात अभ्यासक्रम राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दिग्दर्शक शिवदर्शन कदम यांनी केले. दिग्दर्शक शिवदर्शन कदम यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयशास्त्र विभागात २ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान ४७ वा एकांकिका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाटयशास्त्र विभागात मास्टर्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस् या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचा हा भाग असून या एकांकिका महोत्सवात बी.पी.ए. या अभ्यासक्रमाच्या तिनही वर्षांचे विद्यार्थी आणि एम.पी.ए.तृतीय सत्र तसेच बॅचलर ऑफ ड्रामॅटिक्स या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. ४७ व्या एकांकिका महोत्सवाचे उद्घाटन नाटयशास्त्र विभागात (नाटय चित्रपट दिग्दर्शक शिवदर्शन कदम मराठी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले हे होते. यावेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे यांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर आपले मनोगत वक्त करताना शिवदर्शन कदम म्हणाले, विद्यापीठाचा नाटयशास्त्र विभाग हा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व अभिव्यक्तिला अवकाश देणारा विभाग आहे. बदलत्या काळानुसार नाटक आणि सिनेमा अशा भेद न करता या दोन्ही कलांचा एकत्रित अभ्यासक्रम राबवण्याचा प्रयत्न करावा. यावेळी मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले, नाटयशास्त्र विभागाला देशाला नामवंत कलावंत, दिग्दर्शक दिले आहेत. मराठवाडायातील या कलावंताना राज्य, राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी संधी देऊ, असेही मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. विभागाच्या आजपर्यंच्या वाटचालीला आढावा विभागप्रमुख डॉ.स्मिता साबळे यांनी प्रास्ताविकात घेतला. प्रास्ताविकात डॉ.गजानन दांडगे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ.वैशाली बोधले यांनी सूत्रसंचालन तर डॉ.अशोक बंडगर यांनी आभार मानले. या प्रसंगी एकांकिका महोत्सवातील प्रयोगांचे परिक्षण करण्यासाठी डॉ.ज्ञानदा कुलकर्णी त्याचप्रमाणे विभागातील प्रा.गजानन दांडगे, डॉ.रामदास ढोके, डॉ.सुनिल टाक, प्रा.विशाखा शिरवाडकर, जाई कदम, डॉ.अमजद सय्यद, डॉ.वाघमारे, डॉ.गौतम अडागळे आणि आदींची उपस्थिती

बातम्या आणखी आहेत...