आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • BAMU Update | Univercity Update | The Website Will Remain Open Till August 20 To Complete The Pending Applications For The University's Admission Process

विद्यार्थ्यांना दिलासा:विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अर्धवट राहिलेले अर्ज पूर्ण करण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत संकेतस्थळ सुरू राहणार

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सध्या सुरू असून, प्रवेश प्रक्रियेसाठीची नाव नोंदणी अर्ज प्रक्रियेची बुधवारी सायंकाळी संपली. यात एकूण 5 हजार 903 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती भरण्यात अडचण आली आहे. अथवा काही माहिती राहिलेली आहे. अशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी देखील आल्या आहेत. त्यामुळे आता अर्जांची मोठी संख्या पाहता. नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्त करून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाचे संकेतस्थळ दि.20 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

विद्यापीठ प्रशासन पदव्युत्तर वर्गाची प्रवेश प्रक्रिया सध्या राबवत आहे. सुधारीत वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 17 ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करून शैक्षणिक माहिती अर्जात भरावी लागणार होती. आता अर्ज प्रक्रियेची मुदत संपली. या मुदतीपर्यंत एकूण 5 हजार 903 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली. यात 2 हजार 997 विद्यार्थ्यांनी अर्जात शैक्षणिक माहितीसह इतर संपूर्ण माहिती भरली असून 2 हजार 906 विद्यार्थ्यांची अर्जात अपूर्ण माहिती भरली आहे.

तक्रारी नोंदविता येणार

या अर्जात संपूर्ण माहिती भरण्यासाठी प्रशासन संकेतस्थळ दि.20 ऑगस्टपर्यंत सुरू ठेवणार आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच, 20 ऑगस्टपर्यंत संकेतस्थळावर प्राप्त अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर विद्यार्थ्यांना 23 ऑगस्टपर्यंत अर्जासंदर्भात pgadmisson@bamu.ac.in ईमेलवर तक्रारी नोंदविता येणार आहेत. तसेच काही अभ्यासक्रमाचे निकाल बाकी असल्याने आणि इतर विद्यपीठ प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता आणखी मुदतीच्या तारखामध्ये बदल होऊ शकतो.

शैक्षणिक सत्रास विलंब

शैक्षणिक सत्र सुरू होण्यास विलंब होत असल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजन केले जाईल.त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही अशी माहिती प्र-कुलगुरू श्याम शिरसाट यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...