आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश कुलगुरूचे आदेश:बामू 25  वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड जतन करणार

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागांनी गेल्या २५ वर्षांपासून जतन केले रेकॉर्ड ३१ जानेवारीपर्यंत सुस्थितीत जतन करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिले. मुख्य इमारतीमागील रेकॉर्ड रूमची त्यांनी पाहणी केली. कालबाह्य व भंगार अवस्थेतील सामानाचे निर्लेखन करण्याचेही आदेश त्यांनी दिले. त्यासाठी डॉ.भगवान साखळे यांच्या अध्यक्षतेखाली निर्लेखन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने शैक्षणिक, पदव्युत्तर, स्थावर, लेखा, ग्रंथालय, मुद्रणालय, परीक्षा, आस्थापना, अध्यासन, विद्यार्थी कल्याण आदी ४५ विभागांना भेटी दिल्या. प्रत्येक विभागाकडील आवश्यक साहित्याची नोंद घेण्यात आली. यामध्ये १९९८ पासूनचे विविध प्रस्ताव, नोट्स, रद्दी, शास्त्रीय सामग्री, उपकरणे, संगणक, दूरध्वनी, वाहन, संगणकीय साहित्य आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...