आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगळुरूला जाणारे 91 प्रवासी विमानतळावर ताटकळत बसले:बंगळुरू-छत्रपती संभाजीनगर विमानाला पावसामुळे विलंब

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (४ एप्रिल) चिकलठाणा विमानतळावर येणाऱ्या विमानास विलंब झाला. बंगळुरूला जाणारे ९१ प्रवासी ताटकळत बसले होते. विमान मंगळवार आणि गुरुवारी बंगळुरूहून दुपारी ४ वाजता निघून शहरात दुपारी ५.३५ वाजता पोहोचते तर सायंकाळी परतीसाठी ६.०५ वाजता निघून रात्री ७.४५ वाजता बंगळुरूला पोहोचते. शनिवारी इंडिगोचे विमान बंगळुरूहून दुपारी २ वाजता निघून शहरात ३.३५ ला पोहोचते. परतीसाठी ४.०५ वाजता निघून सायंकाळी ५.४५ वाजता बंगळुरूला पोहोचते. कोविडपूर्वी बंद झालेली बंगळुरूची विमानसेवा २८ मार्चपासून बहाल करण्यात आली आहे. १ एप्रिल रोजी बंगळुरूहून शहरात १२१ प्रवाशी आले तर परतीच्या विमानात १२० प्रवासी गेले. बंगळुरू आयटी क्षेत्रात नावाजलेले असल्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच व्यवसायासाठी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.

विमानसेवा नसल्यामुळे हैदराबाद मार्गे आणि पुणे येथून जाण्याचा पर्याय होता. हैदराबादला विमानसेवा आहे, परंतु पुणे येथे वाहनाने जावे लागायचे. शहरातून थेट सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना बंगळुरू गाठणे सहज सोपे झाले आहे.

१८० प्रवासी क्षमतेचे विमान विमानाची बंगळुरूहून निघण्याची वेळ दुपारी ४ वाजता आहे. चिकलठाणा विमानतळावरून सायंकाळी ६.०५ वाजता निघून बंगळुरूला रात्री ७.४५ वाजता पोहोचते. आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी १८० प्रवासी क्षमतेचे विमान सुरू करण्यात आले आहे.