आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण मध्य रेल्वेने बंगळुरू उत्सव विशेष रेल्वेला एक फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत वाढ दिली आहे. तसेच दि.25 डिसेंबरपासून वेळेत बदल करण्यात आला आहे. दरम्यान , यशवंतपूर येथील थांबा वगळला आहे.
हुजूर साहिब नांदेड-बंगळुरू-हुजूर साहिब नांदेड उत्सव विशेष रेल्वे सात डिसेंबर ते 1 जानेवारी 2021 दरम्यान सुरु आहे. या रेल्वेस एक फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. या रेल्वेच्या वेळेत 25 डिसेंबरपासून बदला करण्यात आला आहे.
बंगळुरू ते हुजूर साहिब नांदेड (06519)उत्सव विशेष गाडी बंगळूर रेल्वे स्थानकावरून रात्री 10.50 वाजता सुटेल. धर्मावरम पहाटे 3.45, गुंटकळ 6.0, रारचूर 8.05,विकाराबाद दुपारी एक वाजता, परळी सायंकाळी 6.40, परभणी रात्री 8.30 आणि नांदेड रेथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल. ही रेल्वे रशवंतपूर रेथे थांबणार नाही.
हुजूर साहिब नांदेड ते बंगळुरू (06520) उत्सव विशेष रेल्वे 25 डिसेंबरपासून हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सकाळी 6.30 वाजता सुटेल. पूर्णा 7.05, परभणी 7.40, गंगाखेड-8.10, परळी9.20, विकाराबाद दुपारी 2.00, रारचूर सायंकाळी 7.12, गुंटकळ रात्री 9.15, धर्मावरम 00.30 मार्गे बंगळूर रेथे सकाळी 4.50 वाजता पोहोचेल., असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे विभागातील जनसंपर्क कार्यालयाने कळवले आहे.
मराठवाडा एक्स्प्रेस गुरूवारीपासून धावणार...
दक्षिण मध्य रेल्वेने बंद केलेली धर्माबाद - मनमाड - धर्माबाद (मराठवाडा एक्स्प्रेस) ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गुरुवारपासून (दि. 24) पुन्हा धावणार आहे.
ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 48 मिनिटे, बदनापूर नऊ वाजून 09 मिनिटे, मुकूंदवाडी 9 वाजून 45 मिनिटे, औरंगाबाद येथे नऊ वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे दहा वाजून 30 मिनिटे, रोटेगाव 11 वाजून 30 मिनिटे, नगरसोल 12 वाजून 20 मिनिटे, अंकई 12 वाजून 49 मिनिटे व मनमाड रेल्वे स्थानकावर एक वाजून 20 मिनिटांनी पोचेल. मनमाड येथून दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासास निघेल. अंकई येथे दुपारी तीन वाजून 18 मिनिटे, नगरसोल दुपारी तीन वाजून 40 मिनिटे, रोटेगाव तीन वाजून 49 मिनिटे, लासूर चारवाजून 19 मिनिटे, औरंगाबाद येथे पाच वाजून 50 मिनिटांनी, मुकूंदवाडी सहावाजून 11 मिनिटे, बदनापूर सहा वाजून 36 मिनिटे, जालना सहा वाजून 50 मिनिटे, रांजनी सात वाजून 14 मिनिटे, परतूर सात वाजून 29 मिनिटे, सेलू सात वाजून 51 मिनिटे, मानवतरोड आठ वाजून चार मिनिटे, परभणी आठ वाजून 43 मिनिटे, पूर्णा येथे नऊ वाजून 33 मिनिटांनी, नांदेड येथे दहा वाजून आठ मिनिटे, उमरी 11 वाजून 10 मिनिटे व धर्माबाद येथे रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी ही एक्प्रेस पोचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.