आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड्स सोहळा:दिव्य मराठीतर्फे बँकिंग, फायनान्स एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळा आज ; केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड, आमदार सावे प्रमुख पाहुणे

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक दिव्य मराठीने ‘गौरव अर्थसेवेचा’ बँकिंग आणि फायनान्स एक्सलन्स अवॉर्ड वितरण सोहळा ४ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता कुलस्वामिनी लॉन येथे आयोजित केला आहे. फक्त निमंत्रितांनाच या कार्यक्रमात प्रवेश असेल. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या शुभहस्ते बँकिंग व फायनान्स क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाईल. आमदार अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. काेराेना संकटातून बाहेर पडलेल्या बँकिंग, फायनान्स व विमा क्षेत्राने उत्तुंग भरारी घेत यशाचे नवनवे मापदंड निर्माण केले आहेत. दैनिक दिव्य मराठी ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या यशस्वी संस्थांमधील मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करणार आहे. आदर्श उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास मानकापे पाटील, देवगिरी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे, अधाने ग्रुपचे मार्गदर्शक देविदास अधाने पाटील, अजिंठा बँकेचे मुख्य व्यवस्थापक संदेश वाघ, नेटव्हॅल्यू फिनकॉर्पचे संचालक मनोज अंभोरे, जेन्युईन इन्शुरन्सचे अध्यक्ष कैलास जैन, शीतल शेअर मार्केटचे अध्यक्ष शीतल बाखरे, कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे, गुरुकृपा अर्बन व बहुरे उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंह बहुरे, शालिवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर चौहान, छत्रपती मल्टिस्टेटचे संस्थापक अध्यक्ष संतोष भंडारी, आनंद इन्व्हेस्टमेंटचे संचालक रतन कुंकुलोळ, अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश देवकर, प्रभात नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा बकाल पाटील, सम्यक वेल्थचे संचालक कमलेश बोरडे, लोकमान्य मल्टिस्टेटचे वरिष्ठ शाखाधिकारी प्रवीण जाधव, देवाई महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा मीना महादेव काकडे, केएमके ग्रुपचे संचालक महादेव काकडे, पाटणी असोसिएट्सचे अध्यक्ष प्रसाद नेमिचंद पाटणी यांचा डॉ. कराड व आमदार सावे यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास ‘द कुटे ग्रुप’ कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांचे विशेष सहकार्य लाभले. ज्युनियर चार्ली सोमनाथ स्वभावणे व युवा कलावंत प्रथमेश पोफळे यांचे बासरीवादन हे कार्यक्रमाचे आकर्षण असतील.

बातम्या आणखी आहेत...