आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांना सूचना:कर्ज वाटप करताना बँकांनी संवेदनशीलपणे काम करावे

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनामार्फत मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. बँकांशी संबंधित असणाऱ्या योजनांचे कर्ज वाटप करताना बँक अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे, अशा सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात साेमवारी किसान क्रेडिट कार्ड योजना व प्रधानमंत्री स्वनिधी योजनांची विभागीय बैठक झाली.

या वेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, उस्मानाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विभागीय व्यवस्थापक महेश डांगे, मुख्य व्यवस्थापक मंगेश केदारे आूदी उपस्थित होते.

डाॅ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्जदारांचे अर्ज विनाकारण रद्द होता कामा नये. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करा. रद्द झालेल्या अर्जांचे सर्वेक्षण करून त्रुटींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पात्र अर्ज मंजूर करा. स्वनिधी ते समृद्धी योजनेत औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आूहे. परभणीचा समावेश करण्याचे प्रयत्न सुरू आूहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेत मासेमारी करणाऱ्यांसह मत्स्य विक्रेत्यांचाही समावेश करणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...