आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:सैलानीबाबा दर्गा-मंदिरात 31 वर्षांपूर्वी बाप्पा विराजमान ; सर्व धर्मांचे लोक दर्शनासाठी येतात

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पडेगाव येथील सैलानीबाबा दर्गा- मंदिरात ३१ वर्षांपूर्वी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. आजमितीला सर्व धर्मांचे लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असून सर्वधर्मसमभावाचा संदेश देत आहेत.दरवर्षी गणेशोत्सवात आनंदाचे वातावरणात बघायला मिळते. यात कोणी विविध देखावे करून सामाजिक उपक्रमही राबवतात. मात्र गेल्या ३१ वर्षांपूर्वी पडेगाव येथील सैलानीनगर येथील सैलानीबाबा दर्गा- मंदिरातील गणराय एकात्मतेचा संदेश देत आहे.या ठिकाणी अध्यक्ष श्याम छत्रबंद, स्वप्निल चौधरी, सुनील म्हस्के, अनिल म्हस्के, शैलेश चौधरी, संदीप म्हस्के, सुजल पोथीकर आदी काम पाहत आहेत. दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर उपक्रम राबवण्यात येतात. येत्या ७ तारखेला चारशे ते पाचशे लोकांसाठी भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती स्वप्निल चौधरी यांनी दिली.

४० वर्षांपूर्वीची समाधी
पडेगाव येथील सैलानीनगरात ४० वर्षांपूर्वी गुरू महाराज शंकरबाबा पोथीकर यांनी गणेशमूर्ती पहिल्यांदा स्थापन केली. २८ वर्षांपूर्वी त्यांनी समाधी घेतली. १५०० ते २ हजार चौरस फुटांच्या जागेच्या परिसरात महादेव मंदिर, हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी हिंदू, शीख, इसाई, मुस्लिम अशा धर्मांचे लोक येतात.

बातम्या आणखी आहेत...