आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीच्या गणपतीचे घरातच कुंडीत करा विसर्जन:पुढच्या वर्षी लवकर येईपर्यंत बाप्पा रोपट्याच्या रूपात सोबत राहतील

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण आपल्या घरात मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली. संपूर्ण श्रद्धाभाव, हर्षोल्हासात गणेशोत्सव साजरा केला. आता विसर्जनाची तयारी सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... या भावपूर्ण जयघोषासह घरातच एका कुंडीत श्रीगणेशाचे विसर्जन करा. मातीचा गजाननच असा आहे जो पुढच्या वर्षी लवकर येईपर्यंत आपल्या सोबत राहील. हा सहवास कुंडीत उगवणाऱ्या रोपट्याच्या रूपात असेल. रोपट्याच्या फुलाच्या रूपात. विसर्जनाच्या मातीत तो ऊर्जा-खत आणि अखंड सुख-समृद्धी बनून राहील. आपण रोज कुंडीत पाणी टाकू, रोपट्याची देखभाल करू तेव्हा ती स्थापना केलेल्या मातीच्या गणपतीची सेवाच असेल. मातीचा गणपती ही आपल्याकडून निसर्गाला दिलेली भेटच असेल आणि आगामी पिढ्यांसाठी संस्कारही!

बातम्या आणखी आहेत...