आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Bappa's Eco friendly Message From The Art Gallery; Establishment Of Shadu's Ganesh Idol In Pune At The House Of Maharashtra Sports Commissioner Omprakash Bakaria

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्साह गणेशाेत्सवाचा:बाप्पाची चित्रयाेग कलेची प्रीती; आर्ट गॅलरीचे मखर प्रकाशमान, आर्ट गॅलरीतून बाप्पाचा पर्यावरणपूरक संदेश

एकनाथ पाठक । औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकाेेरिया यांच्या घरी पुण्यात शाडूच्या गणेशमूर्तीची स्थापना

लाडक्या गणपती बाप्पाची आपल्या ६४ कलांवरची प्रीती कायम ठेवण्यासाठी चित्रयाेगाची कला साकारत महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त आेमप्रकाश बकाेरिया यांनी घरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. यंदा महामारीच्या कठीण काळात पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा खास गणेशाेत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी आयुक्तांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत सहभाग घेतला. यातून त्यांच्या पत्नी प्रीती बकाेरिया यांनी बाप्पाच्या मखराला चित्रयाेगाच्या कलेने प्रकाशमान केले आहे. यासाठी रेखाटलेल्या खास पेटिंग्जच्या मदतीने बाप्पाचे मखर सजवण्यात आले. या सर्व चित्रांतून साकारलेल्या मखरामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. यासाठी शाडूच्या मातीची खास चित्रकाराची मूर्तीही घरीच तयार करण्यात आली. ही चित्रकाराची मूर्ती आठवडाभरात त्यांच्या पत्नी आणि दाेन्ही मुलांनी याेग्य पद्धतीने तयार केली आहे.

आर्ट गॅलरीतून बाप्पाचा पर्यावरणपूरक संदेश

दैवी देणगी लाभलेल्या निसर्गाची खास रेखीव पेंटिंग्ज प्रीती बकाेरिया यांनी रंगवली आहेत. यात निसर्गातील काही लक्षवेधी देखावे आहेत. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यासारखे मखर तयार करण्यात आले. यासाठी खास आठ चित्रे तयार केलेली आहेत. यामध्ये बाप्पा विराजमान झाले. यादरम्यान बाप्पा स्वत: हातातील ब्रशने चित्र काढताना दिसताे.

क्रीडा आयुक्त बकाेरिया यांच्या कुटुबीयांनी वेगळ्या पद्धतीची थीम घेऊन गणेशाेत्सव साजरा करण्याचे निश्चित केले. यासाठी पत्नी प्रीती आणि दाेन्ही मुले रेहान आणि रेयांश यांनी पुढाकार घेतला. त्यामुळे शाडूच्या मातीतून ही मूर्ती करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी घेतलेल्या मेहनतीतून आठवडाभरात शाडूच्या मातीचा चित्रकार असलेल्या गणेशाची मूर्ती तयार करण्यात आली. या सर्वांनी काेणत्याही पूर्वप्रशिक्षणाशिवाय ही मूर्ती तयार केली आहे.

पुण्यातील गणेशाेत्सवातून प्रेरणा

देशभरात पुण्यातील गणेशाेत्सव हा प्रसिद्ध आहे. क्रीडा आयुक्त म्हणून बकाेरिया सध्या पुण्यातील क्रीडा व युवक संचालनालयात कार्यरत आहेत. यादरम्यान त्यांनी पुण्यातील गणपती उत्सवाची ख्याती एेकली. त्यामुळे हा उत्सव जल्लाेषात साजरा करण्याचे ठरवले. यासाठी काेराेनाच्या काळात सर्व नियमांचे पालन करून त्यांनी घरीच हा उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला.