आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने २ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या सुधारित यादीनुसार १०१८ पैकी पात्र ९०२ विद्यार्थ्यांच्या १२ ते १६ डिसेंबरदरम्यान मुलाखती घेणार आहे. त्यामुळे या मुलाखती रद्द करून सारथी व महाज्योतीप्रमाणे फक्त कागदपत्राची पडताळणी करून सरसकट फेलोशिप मंजूर करावी, अन्यथा बार्टीसमोर ७ डिसेंबरपासून आमरण उपोषण करू, असा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०२१ संशोधक विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.
राज्यभरातील विविध विद्यापीठात एमफिल व पीएचडी करणाऱ्या अनुसूचित जातीच्या सुधारित यादीनुसार संशोधक १०१८ पैकी ९०२ संशोधक विद्यार्थ्यांची बार्टी आता लेखी परीक्षाऐवजी १२ ते १६ डिसेंबरदरम्यान मुलाखती घेणार आहे. त्यातून फक्त २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर करणार आहे. त्यामुळे उर्वरित एससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. बार्टीने मुलाखती रद्द केल्याचे पत्र संकेतस्थळावर टाकावे, तसे न केल्यास कृती समिती आंदोलन करेल, असा इशारा भरत हिवराळे, भीमराव मोटे, अमोल खरात, हर्षपाल खाडे, अतुल कांबळे, विकास रोडे, भूषण चोपडे, प्रवीण चिंतोरे, माधुरी तायडे, अलका गायकवाड आदींनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.