आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंदिरात भाविक, वारकऱ्यांनी प्रचंड गर्दी:पुत्रदा एकादशीनिमित्त गोदावरीत केेले स्नान

पैठणएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुत्रदा एकादशीनिमित्ताने साेमवारी पैठणमधील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर व नाथवाड्यातील मंदिरात भाविक, वारकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली हाेती. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने अर्धा तास वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. शहरातील बसस्थानक चौकात काेंडी झाल्याने भाविकांची गैरसाेय झाली. पुत्रदा एकादशीचे महत्त्व असल्याने बाहेरगावाहून आलेल्या भक्तांसह गावातील नागरिकांना गोदावरी नदीपात्रात स्वच्छ पाणी नसल्याने दूषित पाण्यातच स्नान करावे लागले. तीन महिन्यांपासून गोदावरी जायकवाडीच्या विद्युत केंद्रातून पाणी येते. मात्र हे केंद्र बंद असल्याने नदीपात्रातील पाणी अतिशय दूषित झाले आहे. भाविकांनी दिंड्या काढत नाथांचे दर्शन घेतले.

बातम्या आणखी आहेत...