आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिसादेवी रोडवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम पोलिस बंदोबस्तात आमच्या संचालक मंडळाने हाती घेतले होते. मात्र, ते तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या माध्यमातून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंद पडले होते.
खैरे यांनी या ठिकाणी असलेला पोलिस बंदोबस्त हटवण्याचे सांगितले होते. त्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नसल्याचा आरोप करत हे काम लवकरच सुरू होईल, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८२ गाळ्यांचे काम रखडले आहे. गाळेधारकांनी ८० टक्के पैसे भरले आहेत. ८० कोटी रुपयांपैकी केवळ १० ते १५ कोटींचीच कामे राहिली आहेत. विरोधकांनी याच ८० कोटींचे ८८ कोटी करीत त्यांचे राजकारण केले. त्यात तथ्य नसल्यामुळेच आम्ही पुन्हा सभापतिपदावर विराजमान झालो असून प्रथम हे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या वेळी बाजार समितीचे सचिव विजय सिरसाठ उपस्थित होते.
मनपाच्या बस डेपोचे काम बंद करणार
बाजार समितीची १० एकर जागेवर महापालिका बस डेपो बांधत आहे. त्यांनी परवानगी घेतली नाही. कुठलेही लिज न देता तेथे बांधकाम सुरू केले आहे. यासंदर्भात महापालिकेला पत्र देऊन त्वरित काम थांबवणार आहे. यासह जळगाव रोडवरील ४० एकर जागा ही बाजार समितीच्या सातबाऱ्यावर आली आहे. ती ताब्यात घेऊन तिचा विकास करणार असल्याचेही पठाडे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.