आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातक्रारदार ठाण्यात आल्यानंतर चेहऱ्यावर सकारात्मक भाव ठेवा, तुमच्या आवाजातला चढ-उतार संयमित असावा, विनाकारण हातवारे करू नये, असे मॅनर्स अँड एटिकेट्सॉचे मार्गदर्शन शहरातील पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. पोलिस आणि नागरिकांमधला संवाद सुकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पोलिस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वागणूक व प्रतिसादाविषयी कायमच नागरिकांच्या तक्रारी असतात. सातत्याने रागाच्या भरात बोलणे, नीट ऐकून न घेणे, गु्ंडांपासून सामान्यांपर्यंत सर्वांनाच एकाच चष्म्यातून पाहण्याचे प्रकार वारंवार पाहायला मिळतात. परिणामी पाेलिस विभागाची सर्वाधिक प्रतिमा याच कारणांमुळे मलिन झाली. हे प्रतिमा सुधारण्यासाठी तसेच जनता व पोलिसांमधील संवाद संवेदनशील होण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी या विशेष प्रशिक्षणाची संकल्पना राबवली आहे. नामांकित आयएचएमचे प्राचार्य डॉ. आनंद अय्यंगार, अधिष्ठाता ऋषाद काविना, सतीश पवार यांनी त्यात मार्गदर्शन केले.
पहिल्या टप्प्यात शहर पोलिस दलातील १७ पोलिस ठाण्यांमधील ५ सहायक निरीक्षक व २४ उपनिरीक्षकांचा यात समावेश करण्यात आला होता. पुढेही हे प्रशिक्षण सुरू राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, ठाण्यातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना या अशा प्रशिक्षणाची अधिक गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या दिल्या टिप्स { जनतेशी, कनिष्ठांशी व वरिष्ठांशी संवाद कसा असावा { प्रत्येकाला एकाच साच्यातून पाहू नका { प्रत्येक व्यक्ती, त्याची समस्या स्वतंत्रपणे बघा - वर्तन सहानुभूतीपूर्ण ठेवा { तक्रार घेऊन येणाऱ्याचे शांतपणे ऐकून घ्या { मध्येच सल्ले, नाहक प्रश्न उपस्थित करू नका - त्याला झिडकारू नका. { कोणाहीविषयी पूर्वग्रह ठेवू नका. { चेहऱ्यावरचे भाव संतुलित ठेवा. { तुम्ही त्याला ऐकताय याची जाणीव समोरच्यास समाधान देते { प्रत्येक परिस्थितीत देहबोली व्यवस्थित ठेवा. { तक्रारदार, नागरिकांसमोर अनावश्यक हातवारे, - शरीर वेडेवाकडे हलवू नये. { वरिष्ठ, कनिष्ठांसोबतच नागरिकांसोबतच्या संवादातही आदरयुक्त भाव असावा. { नागरिकांना पोलिस ठाण्यात कम्फर्ट झोनचा अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.