आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात वर्षाला दीड लाख नवे इंजिनिअर्स तयार होतात. तथापि, महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम पोर्टलवर १.७५ लाखाहून अधिक इंजिनिअर्सनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. लॉकडाऊनमुळे रसातळाला गेलेेले उद्योग क्षेत्र पूर्ववत होत असले तरी इंजिनिअर्ससाठी नोकऱ्यांच्या तुटवड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
विशेष म्हणजे बारावी पास आणि बीए, बीकॉम, बीएस्सी या पदवीधरांपेक्षा नोकरी न मिळालेल्या इंजिनिअर्सची संख्या अधिक असल्याचे धक्कादायक वास्तव या आकडेवारीतून पुढे आले आहे. उद्योग क्षेत्रातील नोकरीच्या संधी आणि नोकरीच्या शोधात असलेले तरुण यांच्यात संवाद व समन्वय घडवून आणण्यासाठी शासनाच्या कौशल्य विकास व रोजगार मंत्रालयाच्या वतीने नोंदणी केली जाते. या नोंदणीनुसार राज्यातील २३ लाख ५२,४६९ तरुणांनी नोकरीच्या संधीसाठी नावे नोंंदवली आहेत. त्यात इंजिनिअरिंगची पदवी घेतलेल्यांची संंख्या सर्वाधिक म्हणजे १ लाख १२,३२४ आहे, तर ६४,८०२ डिप्लोमा इंजिनिअर्स नोकरीच्या शोधात आहेत. पदवी आणि पदविका मिळून ही संख्या २३.५६% च्या घरात जाते.
महाराष्ट्र शासनाच्या महास्वयम पोर्टलवर राज्यातील २३ लाख ५२,४६९ तरुणांनी नोकरीच्या संधीसाठी नोंंदवली नावे, पुण्यातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.