आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपली संस्कृती जय मानते. जयचा शब्दशः अर्थ एक आत्मविश्वास, आंतरिक ऊर्जा. आपला पराभवावर विश्वास नाही. म्हणूनच एखाद्याचा जयजयकार करताना खूप काळजी घेतली पाहिजे. जयजयकार ही घोषणा नाही, कोटी नाही की, आपण उधळून दिली. श्रीराम-सीता सिंहासनावर बसल्यावर तुलसीदासांनी लिहिले- जनकसुता समेत रघुराई। पेखि प्रहरषे मुनि समुदाई॥ बेद मंत्र तब द्विजन्ह उचारे। नभ सुर मुनि जय जयति पुकारे॥ जानकीसह रघुनाथाला पाहून ऋषींचा समुदाय खूप आनंदित झाला. सीता-रामाला पाहून कोणाला आनंद होणार नाही, हे समजण्यासारखे आहे. ब्राह्मण मंत्र म्हणत होते. त्याच वेळी देव आणि ऋषींनी एकच शब्द उच्चारला - जय हो, जय हो. जो खरोखर योग्य आहे त्याचाच जयजयकार व्हावा याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. कारण आपण एखाद्याची स्तुती करतो तेव्हा त्याचे गुण आपल्यात उतरू लागतात. तुलसीदासांनी तर हनुमान चालिसाच्या ४० चौपाईंची पहिली ओळ जयने सुरू केली. ३७व्या चौपाईत हनुमानाला गुरूच्या रूपात पाहिल्यावर तर तीनदा जय म्हणाले. म्हणूनच आजपासून आपण प्रतिज्ञा केली पाहिजे की, आपण कोणाचा जयजयकार करतो तेव्हा त्याचे गुण आणि तो वाईट असेल तर त्याचे वाईट गुण आपल्यात उतरतील. जयजयकार हा गोंगाट नव्हे, तो योग्य पद्धतीने बरोबर म्हणायला हवा. पं. िवजयशंकर मेहता humarehanuman@gmail.com Facebook:Pt. Vijayshankar Mehta
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.