आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिर्यारोहण:ड्रीम अ‍ॅडव्हेंचर्सची 13 तासांत मोहीम फत्ते

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एव्हरेस्टवीर शेख रफिकच्या मार्गदर्शनाखाली ड्रीम अ‍ॅडव्हेंचर्सच्या सात गिर्यारोहकांनी कळसुबाईच्या रांगेत असलेले नाशिकजवळील दुर्ग त्रिकूट अलंग-मदन-कुलंग हे गडकिल्ले यशस्वी सर केले. त्यांनी हे तिन्ही किल्ले सलग १३ तासांत सर करून मोहीम फत्ते केली. या माहिमेत रवींद्र पानकडे, मयूरेश डांबरी, खुशाल पाटील, नीतिराज जगताप, विशाल संचेती, मेहराज शेख आणि शेख रफिक यांचा समावेश होता.

३० फुटांची रॉक क्लायंबिंग, गुफा, कळसुबाईचे दर्शन : अंबेवारी येथून या सात जणांची टीम पहाटे ४.१५ वाजता चढाईला लागली. त्यांना राजूर येथील गाइड संदीप भांगरे मार्गदर्शन करत होते. अलंग येथील ३० फुटांवर रॉक क्लायंबिंग करून टीम पुढे निघाली. त्यानंतर धोकादायक पायऱ्या पार करत अलंगचा माथा गाठला. टीमने गुफा पाहून तेथून दिसणाऱ्या कळसुबाई डोंगराचा नजारा पाहिला. पाण्याच्या टाक्यांमधील पाणी पिऊन समाधी, राजवाड्याचे अवशेष पाहिले. त्यानंतर टीम खाली परतली.

बातम्या आणखी आहेत...