आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागावाला गेलेले डॉक्टर दांपत्य घरी परतले असता, चोरीसाठी अगोदरच घरात शिरलेल्या चोरट्यांनी त्यांना मारहाण करून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह सिंगापूरचे चलन आणि सात हजारांची रोख रक्कम असा एकूण ९५ हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना १३ नोव्हेंबर रोजी शहानूरवाडी परिसरातील यशोधन बंगलो येथे घडली होती. विशेष म्हणजे डॉक्टर दांपत्याला मारहाण करताना आरोपीच्या खिशातून पडलेल्या मोबाइलआधारे तब्बल महिनाभरानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली आणि मध्य प्रदेशातून दाेन्ही आराेपींच्या मुसक्या आवळल्या. ही धाडसी चोरी शहरातील एका साथीदाराच्या मदतीने केल्याचे आरोपींनी कबूल केले.
मोहंमद नासीर हुसेन मोहंमद आरिफ (२९, रा. मदनपूर, खादर एक्स्टेन्शन सरिता विहार, दक्षिण दिल्ली), रूपेश इंद्रपाल नागले (२६, रा. हिवरखेडी, ता.जि. बैतुल, ह.मु. विवेकानंद वाॅर्ड बग्गुढाण, बैतुल, मध्य प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. विजय कृपाचंद परदेशी (रा. गारखेडा परिसर) असे पसार आरोपीचे नाव आहे. अटक आरोपींविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले. प्रकरणात भूलतज्ज्ञ डॉ. प्रसाद चंद्रकांत देशपांडे (४७, रा. यशोधन बंगलो, केशवनगर, शहानूरवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डॉ. देशपांडे हे नेत्रतज्ज्ञ पत्नी व मुलगी असे तिघे १३ नोव्हेंबर रोजी मित्र नीलेश महाजन यांच्या परिवारासह मालवणला फिरण्यासाठी गेले होते. १७ नोव्हेंबरला रात्री घरी परतले असता हा प्रकार उघडकीस आला.
दोन्ही आराेपींना १४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या साथीदाराला अटक करणे बाकी असल्याने सहायक सराकरी वकील नीता कीर्तिकर यांनी काेठडीची विनंती केली. त्यानुसार आरोपींना १४ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. व्ही. सपाटे यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.