आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजाधववाडीत अवैधरीत्या मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवून पोलिस येताच कुलूप लावून पळण्याच्या प्रयत्नातील अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी संताप अनावर झाल्याने मारहाण केल्याची तक्रार आहे. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, न्यायालयात अनुपस्थित राहत त्याने वरिष्ठांकडे त्याच पोलिसांविरोधात तक्रारी करत गंभीर आरोप केले.
पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ गंभीर गुन्हे आणि आठपेक्षा अधिक वेळा प्रतिबंधात्मक कारवाई, अवैध दारूविक्रीची कारवाई झालेला हरिदास गवनाजी म्हस्के जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जय मल्हार नावाचे हॉटेल चालवतो. त्याने मंगळवारी मध्यरात्री पोलिसांचे वाहन येत असल्याचे पाहताच हॉटेलमधील गिऱ्हाइकांना हॉटेलमध्येच थांबवून बाहेरून लॉक लावून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रपाळीचे पोलिस अधिकारी उपनिरीक्षक बुधा शिंदे यांनी त्याला थांबवून आतून आवाज येत असल्याने ते उघडण्यास सांगितले. म्हस्केने हॉटलचे कुलूप उघडण्यास नकार देताच दोघांमध्ये चावी घेण्यावरून झटापट झाली. यात शिंदे यांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर चावी घेऊन हॉटेल उघडले असता, आत मोठ्या संख्येने गिऱ्हाइके आढळली. त्यामुळे म्हस्केवर कारवाई करत त्याच्याविराेधात न्यायालयात खटला पाठवला.
शॉपसमोर मारहाण, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
म्हस्केला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले हाेते. मात्र, तिकडे अनुपस्थित राहून पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. मला माझ्या शॉपसमोर विनाकारण मारहाण करुन जातिवाचक शिवीगाळ करत शिंदेंनी पैसे काढून घेतले. मात्र, म्हस्के रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून द्वेषातून आरोप करत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.