आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात वीट:कामगारांना रस्त्यात अडवून मारहाण; पाच जणांवर गुन्हा ;  कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमितपणे सकाळी कामावर गेलेले कामगार दिवसभर कंपनीत काम करून घरी परत येताना त्यांना रस्त्यात अडवून डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना १६ जून रोजी रात्री घडली. याप्रकरणी जखमी कामगार अंकुश साहेबराव बडुगे (रा. गट नंबर-१० वडगाव कोल्हाटी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी करण साळे व इतर पाच जणांवर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात १७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आले.

अंकुश व त्याचे इतर कामगार मित्र नहार इंजिनिअरिंग कंपनीतील काम आटोपून सायंकाळी झांबड चौक मार्गे वडगावच्या दिशेने कच्च्या रस्त्याने दोन दुचाकींहून अंकुश, सतीष गायकवाड, दीपक निंबरोट, देशमुख घराच्या दिशेने निघालो होते. दरम्यान, अचानक दर्गा परिसरात समोरील दुचाकीवरील करण साळे व त्याचा मित्र जात होते. या वेळी अंकुश व त्याच्या मित्रांनी साळेच्या दुचाकीला ओहरटेक केले. त्यावर संतापलेल्या साळे व त्याच्या मित्राने शिवीगाळ करत दुचाकी रस्त्यात अडवून अंकुशला मारहाण केली. अंकुश बचाव करत असल्याचे लक्षात येताच त्याच्या डोक्यात वीट मारून त्याचे डोके फोडले.

थोड्या वेळाने अंकुशने त्याच्या भावाला फोन करून बोलावून घेतले असता, भावाच्याही डोक्यात वीट मारून त्याचेही डोके फोडले. तर उर्वरित मित्रांना इतर पाच साथीदारांच्या मदतीने कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. यामुळे सर्वच कामगार घटनास्थळावर एक दुचाकी सोडून पसार झाले. थोड्या वेळाने येऊन त्यांनी दुचाकी पाहिली असता दुचाकीची तोडफोड केल्याचे समजले. पोलिसांनी जखमींना घाटीत रवाना केले. त्यानंतर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...