आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार चषक:बाबा बिल्डरला अवघ्या एका धावेने हरवले ; बॅटको युनायटेडचा विजय

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुवा फाउंडेशनतर्फे आयजे क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत चाैथ्या दिवशी बॅटको युनायटेड संघाने आमखास मैदानावर झालेल्या लढतीत बॅटकोने बाबा बिल्डर्स संघाला अवघ्या १ धावेने पराभूत केले. अष्टपैलू मो. इम्रान (२८*धावा, २ बळी) सामनावीर ठरला. प्रथम खेळताना बॅटकोने १५ षटकांत ८ बाद १०० धावा उभारल्या. अजय काळेने १८, अभिजित साळवेने १५, कर्णधार मो. इम्रानने नाबाद २८ धावा ठोकल्या. शेख अल्ताफ, सय्यद परवेज, विनायक भोईरने २ बळी घेतले.

प्रत्युत्तरात बाबा संघ निर्धारित षटकांत ८ बाद ९९ धावा करू शकला. कर्णधार सलमान अहेमदने ३२ धावा केल्या. विनायक भोईरने २८ धावांचे योगदान दिले. बॅटकोकडून मो. इम्रानने १७ धावा देत २, हरमितसिंग रागीने ११ धावांत २ आणि विजय ढेकळेने १७ धावा देत २ बळी घेतले.

एम्पायर स्टेटची मेट्रो इन्फ्रावर मात : दुसऱ्या सामन्यात एम्पायर स्टेटने मेट्रो इन्फ्रा संघावर ९ गड्यांनी मात केली. शुभम हरकळच्या (६३) अर्धशतकाच्या जोरावर मेट्रोने १५ षटकांत ३ बाद १०३ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात एम्पायरने ११.५ षटकांत १ गडी गमावत विजयी मिळवला. यात शेख मुकिमने नाबाद ४१, अर्शद जैनने ३८ धावा केल्या.

हायटेकने अल आरजी वॉरियर्सला नमवले
तिसऱ्या सामन्यात हायटेक इन्फ्रा स्ट्रायकर्सने अल आरजी वॉरियर्सवर २९ धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना सामनावीर प्रविण देशेट्टीच्य (९४) अर्धशतकाच्या जोरावर हायटेकने १५ षटकांत ५ बाद १३२ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात आरजी वॉरियर्स निर्धारित षटकांत ८ गडी गमावत १०३ धावा करु शकला. हायटेकच्या ऋषिकेश नायरने ३ बळी घेतले.

बातम्या आणखी आहेत...