आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकास:स्मार्ट सिटीच्या लाइट हाऊस उपक्रमात ब्यूटी पार्लर,  फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनानिमित्त स्मार्ट सिटीकडून कौशल्य विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या लाइट हाऊस या उपक्रमात आता व्यावसायिक प्रशिक्षण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यात आता ब्यूटी पार्लर फॅशन डिझायनिंग फूड प्रोसेसिंग माँटेसरी आणि आर्ट आणि क्राफ्टचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम ८ मार्च रोजी सिडको एन-५ येथील लाइट हाऊस केंद्रात सुरू केला. स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, अर्पिता शरद, लाइट हाऊस केंद्रप्रमुख पूजा मोगरे, अरविंद फाउंडेशनच्या नेहा धोके व सविता मगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...