आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या बेधुंद पोलिसांची हाणामारी

सुमीत डोळे | औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर पाेलिस शुक्रवारी गाेपाळकाल्याच्या बंदोबस्तात व्यग्र असताना इकडे बेगमपुरा ठाण्याचे काही कर्मचारी पहाडसिंगपुऱ्याच्या लेणी परिसरात यथेच्छ पार्टी करत हाेते. काही वेळाने त्यांच्यात वाद हाेऊन त्यांनी एकमेकांना मारहाण केली. तेथून ठाण्यासमोर धिंगाणा सुरू केला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेत दोघांना ठाण्यात नेऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

शुक्रवारी रात्री ८ वाजता बेगमपुरा पाेलिसांची पार्टी रंगात येताच दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद हाेऊन मारहाण सुरू झाली. साेबतचे पाेलिस त्यांना बळजबरी गाडीत बसवत होते. नागरिक हा सर्व प्रकार पाहत होते. यात एकाच्या पाठीवर बेल्टचे व्रण उमटले.

साहेब, याने मला लय मारले...
९.३० वाजता एक कर्मचारी कुटुंबासह खासगी वाहन घेऊन ठाण्यासमाेर उभा होता, तर दुसरा कर्मचारी अकांडतांडव करत होता. वरिष्ठांचे वाहन येताच मारहाण झालेला कर्मचारी गाडीकडे गेला. ‘साहेब, यांनी मला लय मारले,’ असे म्हणत तो विनवण्या करू लागला. ‘आपण पोलिस आहोत, बाहेर तमाशा नकाे, आत चला’ असे म्हणत अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना आत घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, रात्री एकमेकांची माफी मागून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, बेगमपुरा ठाण्याचे काही पोलिस लेणीवर दादागिरी करून जोडप्यांकडून पैसे वसूल करतात, असा आरोप परिसरातील रहिवाशांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...