आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांपूर्वी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करणाऱ्याला बेड्या:छावणी पोलिसांची कारवाई; संशयितावर गुन्हा दाखल

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद पडेगाव भागात दरोडेखोरांच्‍या चार जणांच्‍या टोळीने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत सोन्‍याचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे एक लाख 57 हजारांचा ऐवज 19 ऑक्टोबर 2015 रोजी लांबवला होता. या प्रकरणात तब्बल 7 वर्षांनी छावाणी पोलिसांनी एका दरोडेखोराला बेड्या ठोकल्या. सुकट्टी ऊर्फ शिवा चंदन सोळुंके (21, रा. सुंदनगर, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

गुन्‍ह्यात यापूर्वी महेश धनराज सोळुंके (28, रा. लासुर ता. गंगापुर) याला पोलिसांनी 21 ऑ‍क्टोबर 2019 रोजी अटक केली होती. त्‍याच्‍याकडून गुन्‍ह्यातील सोन्‍या-चांदीचे दागिने आणि एक मोबाइल असा सुमारे 45 हजार 300 रुपयांचा ऐवज हस्‍तगत करण्‍यात आला होता. प्रकरणात प्रियदर्शन कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्‍मीबाई शिवदास पवार (32) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, 18 ऑक्‍टोबर 2019 रोजी फिर्यादीचे पती शिवदास पावर हे फेब्रीकेशनच्‍या कामानिमीत्त धुळे येथे गेले होते. त्‍यामुळे घरी फिर्यादी, त्‍यांची सासु आणि तीन लहान मुल होते. ते रात्री घराच्‍या मधल्या माळावर झोपी गेले. मध्यरात्री अचानक चार दरोडेखोर तोंडाला कपडा बांधून घराच्या चॅनेल गेटचे कुलूप तोडून घरात शिरले. आवाजाने फिर्यादीला जाग आल्याने त्‍यांनी आरडा-ओरडा करण्‍याचा प्रयत्‍न केला. तेंव्‍हा दरोडेखोरांपैकी दोघांनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादी व त्‍यांच्‍या सासुचे तोंड दाबत जीवे मारण्‍याची धमकी दिली. त्‍यानंतर दरोडेखोरांनी फिर्यादीसह त्‍यांच्‍या सासुच्‍या गळ्यातील आणि कपाटात ठेवले. सोन्‍या-चांदीचे दागिने, तीन मोबाइल आणि पाकिटातील पाच हजार रुपये असा सुमारे एक लाख 57 हजार 250 रुपयांचा ऐवज घेत दरोडेखोर तिथून लंपास केला. दरम्यान संशयितावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला पोलिस कोठडी

आरोपी सुकट्टी सोळुंके याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहाय्यक सरकारी वकील उध्‍दव वाघ यांनी आरोपीकडून गुन्‍ह्यातील उर्वरित ऐवज हस्‍तगत करायचा आहे. आरोपींचे पसार साथीदार बिरजू चंदन सोळुंके (रा.सुंदरनगर,पडेगाव) आणि धिरज जगन्नाथ पवार (रा.मार्यनगर/पटेलनगर, मानिकपुर ता.कर्वे जि.चित्रकुट युपी) यांचा शोध घेवून अटक करायची असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.

बातम्या आणखी आहेत...