आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:हार्डवेअरच्या गोदामात केमिकलचा स्फोट; एक ठार तर, दाेघे गंभीर जखमी

बीड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना या स्फोटाचा आवाज ऐकू आला

हार्डवेअरच्या गोदामात केमिकलचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाल्याची घटना शुक्रवार (18 डिसेंबर) रोजी सकाळी साडे अकरा वाजता बीड शहरातील जिजामाता चौकातील चंपावती हार्डवेअर गोदामात घडली आहे.

या गोदामाच्या शेजारी एक खासगी हॉस्पीटल आहे. जेव्हा हा स्फोट झाला, तेव्हा शेजारील हॉस्पीटलच्या काचा फुटल्या. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, परिसर हादरुन गेला आणि एक किलोमीटरपर्यंतच्या नागरिकांना या स्फोटाचा आवाज ऐकू आला. या स्फोटातील मयताचे नाव अनिरुद्र सर्जेराव पांचाळ (30, रा.सेलू, ता.गेवराई ह.मु.लक्ष्मणनगर बीड) असे असून गोदामातील कामगार सुधीर जगताप व अ‍ॅपेरिक्षा चालक पांडूरंग मुने हे स्फोटात जखमी झाले आहेत. बीड शहरातील जिजामाता चौक परिसरात व्यापारी नितीन भगवानदास लोढा यांचे प्लायवुडचे गोदाम आहे. या ठिकाणी प्लायवुडसह फेविकॉल तसेच इतर काही केमिकलचे कॅन ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी या ठिकाणी काम करणारे अनिरूद्र पांचाळ हे तिथे आलेले असतांना अचानक जुन्या केमीकलचा स्फोट झाला. यात गंभीररीत्या जखमी झाल्याने पांचाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर अ‍ॅपेरिक्षामध्ये क्र.(एम.एच.23-7166) असलेल्या पांडूरंग मुने या व्यक्तीचा गंभीर मार लागला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, अ‍ॅपेरिक्षासह गोदामासमोर उभ्या असलेल्या दुचाकीचे क्र. (एम.एच.23 बी.ए.4850) मोठे नुकसान झाले. या स्फोटाची कारणे शोधण्यासाठी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला.

बातम्या आणखी आहेत...