आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेमडीसीवीर इंजेक्शन:बीड जिल्ह्यात येणार आगाऊ 10 हजार रेमडीसीवीर इंजेक्शन, एकट्या परळीत तीन हजार इंजेक्शन उपलब्ध

बीड9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंडित अाण्णा मुंडेंच्या नावे कोविड केअर सेंटर

बीड जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत असुन काेरोना बाधीत रूग्णांच्या नातेवाईकांची रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी होणारी धावपळ आता थांबणार असुन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातुन जिल्ह्यात आता १० हजार रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत.त्यात एकट्या परळी मतदार संघात शासन नियमाच्या अधीन राहून तीन हजार रेमडीसीविर उपलब्ध होणार आहेत. परळी शहरात खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना नाथ प्रतिष्ठान मार्फत हे इंजेक्शन आवश्यकतेनुसार मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

जिल्ह्यात सध्या कोरोना बाधीतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रेमडीसीविर इंजेक्शनचा तुटवडा होत असुन पर्यायाने मेडीकल दुकानात काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शासकीय रुग्णालयांमध्ये औषध प्रशासन विभागामार्फत आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करण्यात येतात. मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये मात्र रुग्ण व नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनी हे इंजेक्शन मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यांचे हे हाल थांबवुन रूग्णाला वेळेवर इंजेक्शन मिळावे म्हणून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी औषध प्रशासन विभाग, उत्पादक व वितरक यांच्याशी समन्वय साधून शासन नियमांच्या अधीन राहून जिल्ह्यासाठी आगाऊ १० हजार इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली केल्या आहेत. हे इंजेक्शन शासकीय यंत्रणेद्वारे वितरकांमार्फत खाजगी रुग्णालय व नातेवाईकांना दिली जाणार आहेत. दहा हजार इंजेक्शन पैकी तीन हजार इंजेक्शन हे शासन नियमाच्या अधीन राहून परळी मतदारसंघातील गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येतील व या इंजेक्शनचा खर्च धंनजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील नाथ प्रतिष्ठान मार्फत केला जाईल, अशी माहिती स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली असुन परळीत हे इंजेक्शन गरजुंना मोफत मिळणार आहे.

जगमित्र कार्यालयाकडून कोरोना हेल्प सेंटर
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामार्फत चालणाऱ्या कोरोना हेल्प सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची विचारपूस करणे, त्यांना बेड, गरजेनुसार ऑक्सिजन-व्हेंटिलेटर, रेमडीसीविर आदी उपचार मिळवून देण्यासाठी मदत करणे हे कार्य सुरूच असून यामार्फत हजारो रुग्णांना मदत करण्यात येत आहे. वाल्मिक कराड यांच्यासह परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व मुंडेंच्या कार्यालयातील कर्मचारी यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत.

पंडित अाण्णा मुंडेंच्या नावे कोविड केअर सेंटर
परळी शहरात चालणाऱ्या या कोरोना हेल्प सेंटरमध्ये परळी, बीडच नव्हे तर राज्यभरातून मदतीसाठी फोन येत असल्याने गरजुंना मदत केली जात असुन अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये विविध योजनांचा लाभ तसेच बिलात सवलत मिळवून दिली जात आहे. स्व. पंडित अण्णा मुंडे यांच्या नावे सर्व सुविधा युक्त ५० बेडचे कोविड केअर सेंटर देखील उभारण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...