आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:हाडाची काड करून जपलेला ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळुन खाक

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शॉर्ट सर्किटमुळे शेतातील ऊसाला लागली आग

विद्युत महावितरण खाते बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. शेतातून गेलेल्या विद्युत तारेचे घर्षण होऊन बीड तालुक्यातील मण्यारवाडी येथील नारायण जाधव यांच्या शेतातील एक एकर पेक्षा अधिक ऊस जळुन खाक झाले आहे. ही घटना काल(दि. 23) डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

अनेक वेळा विद्युत पोलच्या कट पॉईंट पासून पिके जळण्याबाबतची तक्रार देऊन देखील कसलीच उपाययोजना करण्यात आली नाही, परिणामी शेतकऱ्याचा ऊस जळुन खाक झाला आहे. शेतकरी शेतात उपस्थित असताना देखील ही आग सदर शेतकरी रोखू शकले नाहीत. महावितरणने याबाबतची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नसून यापूर्वीही काही वर्षांत कित्येकदा विद्यूत पोलमुळे ऊस जळलेला असल्याचे नारायण जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...