आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परळी पंचायत समितीतील भाजपच्या 'त्या' तीन सदस्यांनी आज दुपारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची भेट घेऊन विश्वास व्यक्त केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे दात त्यांच्याच घशात गेले असून पालकमंत्री धनंजय मुंडे तोंडघशी पडले आहेत. राष्ट्रवादीने भाजप सदस्यांच्या प्रवेशाची केलेली बनवाबनवी कालच उघड झाली होती, हे विशेष.
राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या स्वतःच्याच सभापतींवर अविश्वास ठराव आणला होता त्याची सुनावणी काल झाली. हा ठराव मंजूर व्हावा यासाठी त्यांनी खोटे बोलून भाजपच्या तीन सदस्यांना पळवले होते. सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस नोट काढून भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माध्यमांना सांगितले. वास्तविक ते तीनही सदस्य भाजपच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, असे असतांना राष्ट्रवादीने माध्यमांची दिशाभूल करून त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या दिल्या होत्या
भाजपचे ते तीन सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे व मोहन आचार्य यांनी आज दुपारी वैद्यनाथ साखर कारखान्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. या भेटीमुळे राष्ट्रवादीचा बनाव उघड झाला असून पालकमंत्री तोंडघशी पडले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.