आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत:औरंगजेबाच्या कबरीचे घेतले दर्शन, परत येताना ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे तेलंगाणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी आज खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत औरंगाबादचे एमआयएम खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. या क़ृतीमुळे आता अकबरुद्दीन ओवैसींवर टीका होत आहे.

ओवैसींची गुरुवारी औरंगाबादेत सभा झाली. तत्पूर्वी, त्यांच्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. खुलताबादहून औरंगाबादकडे येताना पडेगाव भागात हा अपघात झाला. त्यानंतर ओवैसींनी स्वतः दुचाकी चालकाच्या प्रकृतीची माहिती घेतली.

अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत खा. इम्तियाज जलिल, माजी आमदार वारिस पठाण आदी नेते उपस्थित होते.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी खुलताबादेतील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत खा. इम्तियाज जलिल, माजी आमदार वारिस पठाण आदी नेते उपस्थित होते.

अकबरुद्दीन ओवैसी हे तेलंगाणा येथील सालार ए मिल्लत एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष असून, याच माध्यमातून ते औरंगाबादमध्ये एक शाळेची उभारणी करण्यात येणार आहे. त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी अकबरुद्दीन ओवैसी औरंगाबादेत आले असून, एमआयच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. खासदार इम्तियाज जलिल यांनी 'आ रहा हू मै' अशी पोस्ट सोशल मीडियावर केली होती. आज दुपारी 4 वाजता त्यांची सभा होणार असून, त्यासाठी शेकडो कार्यकर्ते हजर झाले आहेत.

धार्मिक स्थळांना दिल्या भेटी

अकबरुद्दीन ओवैसींनी औरंगाबादमध्ये आल्यानंतर विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की परिसरातील हजरत सय्यद शाह दर्ग्यालाही त्यांनी भेट देत दर्ग्यावर चारद चढवली. त्यांनतर त्यांनी खुल्ताबादेतील औरंगजेबच्या कबरीलाही भेट दिली.

2015 केली होती शाळेची घोषणा

2015 च्या महानगर पालिका निवडणुकीदरम्यान हैदराबादच्या धर्तीवर शहरात भव्य शाळा उभारण्याची घोषणा एमआयएमने केली होती. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी या शाळेच्या भूमिपुजनाला मुहूर्त सापडले आहे. हिमायत बागेच्या शेजारी असलेल्या दोन एकर जागेवर पाच मजली शाळेची इमारत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...