आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरवासीयांची प्रतीक्षा संपली:मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सभेपूर्वी शहरासाठी मंजूर केलेल्या जलवाहिनीच्या कामाला मुहूर्त लागला

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी मंजूर केलेल्या जलयोजनेतील मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला. 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादेत सभा होत आहे. 6 जून रोजी नारळ फोडून जलवाहिनीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शहरवासीयांचा अनेक वर्षांची प्रतीक्षेला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेपूर्वी

मुंबईत बैठक घेऊन जलयोजनेच्या कामाचा आढावा घेतला होता. तातडीने काम सुरू केले नाही तर कारवाईचा इशारा दिला होता. संथगतीने काम केले म्हणून कंत्राटदाराला व संबंधित विभाग प्रमुखांना तंबी दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) व कंत्राटदाराने मोठी धडपड करत 6 जूनपासून अखेर मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरूवात केली. पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोरील यशवंतनगर येथून वाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ एमजेपीचे उपअभियंता किरण पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून यंत्रांच्या पूजनाने करण्यात आला.

पाईप निर्मितीला विलंब

राज्य सरकारने शहरासाठी 1680 कोटी रुपयांची नवीन जलयोजना मंजूर केली आहे. एमजेपीच्या माध्यमातून या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीला दिले आहे. कंपनीने नक्षत्रवाडी येथे कारखाना उभारून त्यामध्ये मुख्य जलवाहिनीसाठी लागणार्‍या पाईपची निर्मिती सुरू केली आहे. मात्र, कोरोनामुळे तांत्रिक कर्मचारी आणण्यास अडचण आल्याने पाईप निर्मितीला विलंब लागला. त्यासोबतच इतर कामेही ठप्प झाली. त्यातच कंत्राटदार कंपनीने स्टिलचे भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने भाववाढ द्यावी, अशी मागणी पुढे केली.

जलयोजनेच्या कामाचा आढावा

पालकमंत्री सुभाष देसाई, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत वरिष्ठ अधिकार्‍यांची मुंबईत बैठक घेतली. कंत्राटदाराला तातडीने कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. तरी देखील कामाला गती मिळत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालत मागील आठवड्यातच जलयोजनेच्या कामाचा आढावा घेत कामाला गती देण्याचे आदेश दिले.

यामुळे पाईपच्या निर्मितीला कंत्राटदाराने गती दिली आहे. तसेच पाईपच्या कोटिंगची त्रयस्थ संस्थेकडून लगेच तपासणी करून अहवाल दिला जात आहे. त्यानंतर मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी तयार केलेले पाईप ट्रकमधून पैठणकडे रवाना केले जात आहेत.

कंत्राटदारावर कारवाई करा

दोन दिवसांत सहा पाईप पाठवण्यात आले आहेत. पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या यशवंतनगर येथून 2,500 मिमी. व्यासाच्या मुख्य वाहिनी टाकण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पोकलेन आणि जेसीबीने खड्डे खोदून त्यामध्ये पाईप टाकले जात असल्याचे जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य अधिकारी निर्णय अग्रवाल यांनी सांगितले. 24 तास पाईपची निर्मितीकामात निष्काळजीपणा होत असेल तर कंत्राटदारावर कारवाई करा, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

त्यामुळे जीव्हीपीआर कंपनीने तातडीने कामाची गती वाढवून पाईपची निर्मिती 24 तास सुरु केली आहे. साडेसात मीटर लांब आणि साडेआठ मीटर व्यासाचे अवाढव्य पाईप तयार केल्या जात आहेत. एमजेपीने नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेकडून पाईपची तपासणी देखील करण्यात आली. त्यानंतर कोटिंगच्या कामालाही गती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...