आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विविध विभागात राबविण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. बुधवारपासून ही प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, ३ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. त्यानूसार २५ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून विद्यापीठात सुरु असलेल्या ९ अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यामध्ये बी.व्होक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीय अ‍ॅओमेशन (पदवी), अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड ग्राफीक्स आटर्स अ‍ॅडव्हान्स (डिप्लोमा), सर्टिफिकेट ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन पेंâच (डिप्लोमा), अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा ऑफ प्रोफिसियन्सी इन चायनीज, जर्मन, प्रेंâच (अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा), बी.ए.जनसंवाद व वृत्तपत्र विद्या (पदवी), बॅचलर ऑफ परफॉमिंग आर्टस् बी.पी.ए, (पदवी), बी.एफ.ए ब्रीज कोर्स (पदवी एक वर्ष), सर्टिफिकेट इन मोडी स्क्रिप्ट (पदविका) या विषयांता समावेश आहे. प्रवेशासाठी ‘सीईटी‘ असणार नाही तर गुणवत्तेच्या आधारावर ४ ते १४ सप्टेंबर दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊन लगेच तासिकांना सुरुवात होईल, असे पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु कऱ्हाळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...